आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OLX द्वारे केलेल्या संपर्कात तरुणाची फसवणूक; 36 हजार लुबाडण्याचा होता डाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिर्याद देतांना खाचणे - Divya Marathi
फिर्याद देतांना खाचणे

यावल - शहरातील एका तरूणाची ओएलएक्स व्दारे चारचाकी वाहन विक्रीची जाहिरात करून ३६ हजारात फसवणूक केल्या प्रकरणी एका विरूध्द गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत पुणे येथील असुन त्याचे नाव जतिंदर सुरिंदरकुमार सहानी असे आहे तेव्हा मोबाईल अॅप्सव्दारे अशा प्रकारे फसवणूक झाल्याने एकचं खळबळ उडाली आहे.


 शहरातील पुर्णवाद नगरातील रहिवासी निलेश मोतीराम खाचणे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सप्टेंबर २०१७ मध्ये ओएलएक्स वर चारचाकी वाहन विक्रीची जाहिरात पाहिली ती जाहिरात मारोती ८०० क्रमांक एम. एच.०२ पी.ए. ६५१८ या वाहनाची होती.  तेव्हा या वाहन विक्रीची माहिती टाकणाऱ्या पुणे येथील एस. न.२५६ सई अपार्टमेंट फ्लॅट नं.२ वडगाव ग्रीन थिंग हॉटेलच्या मागे राहणाऱ्या जतिंदर सुरिंदरकुमार सहानी याच्याशी त्यांनी संपर्क साधला व वाहन संर्दभात अधिक माहिती मिळवत ४० हजारात खरेदीचे ठरले.

 

  तेव्हा सहानी यांनी त्यांच्या स्टेट बँकेतील खात्याची माहिती खाचणे यांना दिली व पैसे खात्यावर टाकण्याचे सांगत पैसे मिळाल्यावर वाहन यावलला पाठवुन देतो असे सांगीतले तेव्हा २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर या चार दिवसाच्या कलावधीत त्यांनी सहानी यांना तब्बल ३६ हजार रूपये बँकेच्या खात्यात टाकून दिलेे मात्र, तेव्हा पासुन आजवर सहानी यांनी वाहन पाठवले नाही.  व सतत टाळाटाळ केली गेल्या आठ महिन्या पासुन होत असलेल्या टाळाटाळ मुळे खाचणे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुरूवारी त्यांनी यावल पोलिसठाणे गाठत सहानी विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...