आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल- निधी अपहार प्रकरणी फरार ग्रामविकास अधिका-याला अटक, आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- किनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयित ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यास रविवारी रात्री पोलिसांनी सापळा लावून अटक केली आहे. रोकडे भुसावळला येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधी या प्रकरणातील फरार आरोपी सरपंच ज्योती अशोक महाजन यांना बुधवारी (दि.१३) अटक झाली होती. त्यांची पाच दिवसाची पोलिस काठडी आज साेमवारी संपत असून दोघांना यावल न्यायालयात  हजर केले जाणार आहे. याप्रकरणात आणखी काही लोकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून आरोपींची संख्या वाढू शकते.

 

या प्रकरणी नोंव्हेबर 2017 मध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर 19 लाख 25 हजारांचा 14 वा वित्त आयोगच्या निधीत अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.  तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रभान रोकडे यांनी सरपंच ज्योती अशोक महाजन यांच्या सोबत संगनमत करून निधीचा अपहार केल्या प्रकरणी दिनांक 27 नोव्हेंबर 2017 रोजी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा संशयितांनी आधी जिल्हा सत्र न्यायालय व नंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिन मिळण्याकरतारीता धाव घेतली होती मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांना जामीन मिळाला नव्हता. तर ज्योती महाजन यांना १३ जून रोजी किनगावातून तर रविवारी (दि.१७) रात्री ग्रामविकास अधिकारी रोकडे यांनी भुसावळातुन पोलिसांना सापळा लावुन अटक केली. पुढील तपास पोलिस निरिक्षक डी.के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अशोक आहिरे, हवालदार संजीव चौधरी करीत आहे.
 

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
या अपहारप्रकरणी मुख्य संशयितास ताब्यात घेतले असुन अपहार केल्या गेलेल्या रक्कमेत सभेचा ठराव, सह उपसरपंच किंवा इतर अजुन कुणी सदस्य या अपहारात समील आहे का ? अपहाराची रक्कम अजुन कुणी लाटली आहे का? या कामी ग्रामपंचायतीचे दफ्तर तपासणी केली जाईल व प्रसंगी अजून आरोपी यात वाढण्याची शक्यता तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अशोक आहिरे यांनी व्यक्त केली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...