आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांवरील रागामुळे तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटवरुन घटनेचा उलगडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लहानपणीच गर्भवती आईचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांनी मुलास त्याच्या मामाकडे सोडून दुसरे लग्न केले हाेते. तर वडिलांनी चांगल्या पद्धतीने पालन-पोषण न केल्याचा राग मनात धरुन २२ वर्षीय तरुणाने रविवारी रात्री आशाबाबा नगरातील शिरसोली-जळगाव डाऊन रुळावर धावत्या रेल्वे समाेर झोकून देत आत्महत्या केली. दरम्यान, तरुणाच्या खिशात मिळालेल्या सुसाईड नोटवरुन घटनेचा उलगडा झाला आहे. 


अर्जुन नगरमधील संदीप बाळू वराडे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीप वराडे या तरुणाने रविवारी रात्री १०.३० वाजता आशाबाबा नगरातील शिरसोली-जळगाव डाऊन रुळावर धावत्या रेल्वे समाेर झोकून देत आत्महत्या केली. घटनेनंतर छिन्न-विच्छिन्न मृतदेह रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला होता. संदिपच्या खिशात मिळालेल्या कागदपत्रांवरून सोमवारी सकाळी त्याची ओळख पटवण्यात आली.


कागदपत्रांवरुन पटली अाेळख 
संदीप लहान असताना त्याच्या गर्भवती आईचा मृत्यू झाला. यानंतर वडलांनी संदीपला मामा विजय बारी यांच्याकडे सोपवून दुसरे लग्न केले. वडलांनी आपले याेग्य पालन-पोषण केले नाही, हा राग संदीपच्या डोक्यात होता. संदीपचे शिक्षण पूर्ण होऊन तो सध्या एका व्यसनमुक्ती केंद्रात नोकरीस लागला होता. त्याने रविवारी रात्री रेल्व‌े‌खाली आत्महत्या केली. खिशातील कागदपत्रांवरुन त्याची ओळख पटली. दरम्यान, माझ्या मृत्यूस वडिलांना जबाबदार धरावे. मामा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा यात काहीच दोष नाही, त्यांना दोषी धरु नये, असा उल्लेख त्याने सुसाईड नोटमध्ये केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...