आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक काँग्रेस निवडणूक; २५ हजार सभासद नोंदणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यातील युवकांचे संघटन वाढून युवकांचा राजकीय प्रक्रियेत सहभाग वाढावा, या दृष्टीने जिल्ह्यात युवक कॉग्रेसचे संघटन वाढवले जाणार आहे. आगामी युवक कॉग्रेस निवडणुकीसाठी २५ हजार सदस्यांची नोंदणी झाली असून ती येत्या ३ दिवसांत १ लाखापर्यंत पोहचणार आहे. या नोंदणीतून पुढील ३ महिन्यांत युवक काँग्रेसच्या निवडणुका घेतल्या जातील अशी माहिती मध्य प्रदेश युवक कॉग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा पक्ष निवडणूक अधिकारी शिवराज चंद्रोल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 


चंद्रोल म्हणाले की, निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील युवक संघटनेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी पक्षाने माझी नियुक्ती केली आहे. ११ जून रोजी झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार ९ जुलैपर्यंत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सदस्य नोंदणी केली जात आहे. या नोंदणीतून सक्रिय सदस्यांची मतदार यादी बनवली जाणार असून हे मतदार मतदानास पात्र असतील. ११ विधानसभा संघातून प्रत्येकी १ तालुकाध्यक्ष, १ जिल्हाध्यक्ष, १ जिल्हा महासचिव, १ प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सचिव निवडला जाईल. पारदर्शी पद्धतीने निवडणुका घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका निवडणुकीतही ८ ते १० उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेस श्याम तायडे, जगदीश गाढे, मीरा सोनवणे, विष्णू घोडेस्वार, मुक्तगीर देशमुख उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...