आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार करुन घरी परतत होते बहीण-भाऊ; रस्त्यात झाले असे काही, तासभर हंबरडा फोडत होती मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्यातील विरावली-कोरपावली रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्‍याची 15 वर्षीय लहान बहीण गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवारी संध्‍याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बाळू रूमसिंग पावरा (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. ते पांढरी वस्ती, हरिपुरा येथील रहिवासी आहेत.

 

अधिक माहिती अशी की, सातपुड्यातील आदिवासी पाडा पांढरी वस्ती येथील रहिवासी बालु रूमसिंग पावरा व त्यांची लहान बहिण गिता रूमसिंग पावरा हे दोघे दुचाकीवरुन यावल येथे बाजार करण्‍यासाठी गेले होते. बाजार झाल्‍यानंतर संध्‍याकाळी हरिपुरा मार्गे ते घरी येत असताना साडे सातच्या सुमारास विरावली – कोरपावल रस्त्यावर महेलखेडी गावाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. हे वाहन कोरपावलीहून यावल कडे जात होते.  

 

अपघातामध्‍ये बालू यांच्‍या डोक्याला जबर दुखपत झाली व ते जागीच ठार झाले. त्यांची बहिण गिता पावरा हिच्या डोक्यालाही जबर दुखापत झाली व तिच्‍या उजव्या पायाचे हाड मोडले. यावल ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करीत तिला जिल्हा सामान्य रूग्णालय, जळगाव येथे हलवण्यात आले आहे. घटनास्थळी दाखल होत सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश तांदळे यांनी पंचनामा केला आहे. तसेच बालू यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता यावल रूग्णालयात आणण्यात आला आहे

 

मृत भावाजवळ तासभर हंबरडा फोडत होती गीता
रस्त्यावर मोठ्या भावाचा मृतदेह व स्वत:ही गंभीर जखमी गिता तासभर रस्त्याच्या कडेला हंबरडा फोडून रडत होती. महेलखेडी येथील पटेल समाजातील तरूणांना घटना समजल्यावर त्यांनी तिला रूग्णालयात दाखल केले व अपघाताची माहिती पोलिसांना कळवली. मृत बालू पावरा हा विवाहित होता व त्यास दोन मुलं आहेत, असे मृताच्या नातलगांनी सांगितले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...