आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन खरेदी केली 85 हजारांची सायकल, तंत्र एेकून तज्ज्ञही चक्रावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- औरंगाबादच्या एका फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन 85 हजार रुपयांची सायकल आॅनलाईन खरेदी करुन या कंपनीला गंडा घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला आज कोर्टात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने गंडा घालण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिल्यानंतर फायनान्स कंपनी तसेच तंत्रज्ञानाचे तज्ज्ञही चक्रावले आहेत. 

 

मिळालेल्या माहितीनुसार, निशांत कोल्हे (रा.कोल्हे नगर, जळगाव) याने औरंगाबाद येथील एका फायनान्स कंपनीच्या वेबसाईट व आॅनलाईन सेवेत छेडछाड करुन त्यांच्या ईएमआय वॉर्ड प्रणाली या सेवेद्वारे एका कंपनीकडून 85 हजार 559 रुपये किमतीची सायकल आॅनलाईन मागविली. कंपनीच्या नावावर आॅनलाईन व्यवहार होत असताना प्रत्यक्षात माल डिलिव्हरी करणा-या कंपनीला पैसेच मिळत नसल्याचा प्रकार उघडकीस आला. नंतर कंपनीने केलेल्या चौकशीत निशांत याने दिग्विजय पाटील या नावाने ही सायकल मागविल्याचे समोर आले. त्यानुसार कंपनीचे जहीरोद्दीन शेख (रा.औरंगाबाद) यांनी जळगाव येथील रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यानुसार कोल्हे याच्याविरुध्द आय.टी.अ‍ॅक्टनुसार गुन्हा करण्यात आला. 


हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद येथील फायनान्स कंपनीचे अधिकारी व सायबरमधील तज्ञ जळगावात दाखल झाले आहेत. त्यांनी कोल्हे याची चौकशी केली असता दिग्विजय हे नाव बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कोल्हे तंत्रज्ञानाची देत असलेली माहिती ऐकून फायनान्स कंपनी तसेच तंत्रज्ञानाचे तज्ज्ञही चक्रावले आहेत. कोल्हे हा मुख्य सूत्रधार आहे की यामागे आणखी कोणी आहे याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शानाखाली उपअधीक्षक सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम हे यांनी ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...