आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर अपघातात गंभीर जखमी युवकाच्या जबड्यात त्रिशूलचे तुकडे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महमार्गावर मुक्ताईनगरजवळ एक युवक शुक्रवारी गंभीर जखमी अवस्थेत पडलेला हाेता. पादचाऱ्यांच्या माहितीवरून त्याला १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्याच्या जबड्याचा एक्स-रे काढला असता, त्यात ट्रकच्या केबिनजवळ शाेभेसाठी लावण्यात अालेल्या त्रिशूलचे दाेन तुकडे अाढळले. त्यातील एक तुकडा शस्त्रक्रिया करून काढण्यात अाला. 


राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर शहराजवळ रस्त्याच्या कडेला एक युवक गंभीर जखमी अवस्थेत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अाढळला. त्याच्या पायाला व जबड्याला जखमा झालेल्या हाेत्या. पाय व चेहरा रक्तबंबाळ झालेला हाेता. नागरिकांनी त्याला पाणी पाजून तातडीने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बाेलावून जिल्हा रुग्णालयात रवाना केले. याठिकाणी त्याच्या खिशातील कागदपत्रांवरून त्याचे नाव भूपेंद्रकुमार (वय ३०, रा. जालंधर, पंजाब) असे असल्याचे समाेर अाले. जिल्हा रुग्णालयातील नाेंदवहीवर एसडीएस मुक्ताईनगर असे दाखल करणाऱ्याचे नाव लिहिण्यात अाले अाहे. मात्र, या युवकाच्या साेबत एकही नातेवाईक नाही. दुपारी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या जबड्याचा एक्स-रे काढला. त्यात त्रिशूलचे दोन अणुकुचीदार तुकडे जबडा व घशात अडकलेले असल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्या घशातून एक तुकडा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. दुसरा तुकडा तसाच अडकलेला होता. तो तुकडा काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. 


एक शक्यता अपघाताची तर दुसरी शक्यता हाणामारीची 
१ गंभीर जखमी झालेल्या युवकाच्या जबड्यात जे त्रिशूल अडकले अाहेत, ते ट्रकच्या सहायक चालकाच्या दिशेकडील केबिनच्या प्रवेशद्वाराजवळ शाेभा वाढावी म्हणून लावलेले असतात. ट्रकमध्ये क्लिनरच्या बाजूने बसलेला असताना अपघात झाला असावा. यात ट्रकला लावलेले त्रिशूल जबड्यात घुसले असावे, ही पहिली शक्यता अाहेे. 
२ ट्रकचालकाशी एखाद्या विषयावरून शाब्दिक चकमक झाली असावी. त्यात ट्रकचालकाने महामार्गावर मारहाण करताना त्रिशूलचा वापर केला असावा. जखमी झाल्यानंतर संबंधित मारहाण करणाऱ्याने त्याला मुक्ताईनगरजवळ महामार्गावर साेडून पळ काढला असावा, अशी दुसरी शक्यता अाहे. 


जखमी युवकाला बाेलता येणे अवघड 
जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अालेल्या या जखमी युवकाला शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बाेलता येत नव्हते. त्याच्या जबड्यातील एक त्रिशूलचा तुकडा काढण्यात वैद्यकीय पथकाला यश अाले. मात्र, दुसरा तुकडा अजूनही घशाजवळच अडकलेला अाहे. त्यामुळे त्याला अावाज काढताना अडचणी येत अाहेत. जखमी युवकावर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दुसरी शस्त्रक्रियाही तातडीने करावी लागणार अाहे. त्यानंतर त्याला बाेलता येते की नाही? हे स्पष्ट हाेईल. त्याला जेव्हा पूर्णपणे बाेलणे शक्य हाेईल, तेव्हाच घटना नेमकी कशी घडली असावी? याचा उलगडा हाेईल.

बातम्या आणखी आहेत...