आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगवीतील तरूणांनी श्रमदानातून घडवली जलक्रांती, गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- सांगवी गावातील तरुणांनी एकत्र येऊन जलक्रांती घडवून आणली आहे. प्रत्येक गावातील तरूणांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम सांगवीतील तरूणांनी राबवला आहे. श्रमदानाच्या माध्यामातून गावपरिसरात 10 पेक्षा अधिक बंधारे बांधण्याचे काम या तरूणांने केले आहे. तसेेच गावाशेजारील नदी पात्रात 15 ठिकाणी खोलीकरण केले. यामुळे सांगवी गावच्या        पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तरुणांनी हाती घेतलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.


सांगवीतील काही तरूणानी एकत्र येऊन राजकारण विरहीत नविन उपक्रम राबविल्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला प्रत्येकाकडून वैयक्तीकरित्या उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 'पाणी अडवा पाणी जिरवा' या हॉट्स अॅप गृपवर गावातील आणि बाहेरगावी नोकरी निमित्त स्थायिक झालेले सांगवीकर एकञ आले. त्यानंतर जे घडले ते एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते. पाण्याच्या प्रश्नासाठी सर्व गाव एकञ आले आणि पाणी कसे जिरवता येईल यासाठी अक्षरश: चळवळ सुरु झाली. 


तरूणांनी सुरुवातीला या कामामध्ये पारंगत असलेल्या वेगवेगळ्या तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेतले. कामाची सुरुवात शिवार फेरीने, तसेच नदीची पाहणी करुन करण्यात आली. पाण्याच्या चळवळीसाठी पुढे सरसावलेल्या तरुणांनी शिवार फेरी दरम्यान एक दगड बंधारा बांधून कामाला सुरुवात केली. तरुणांमध्ये या कामासाठी जो उत्साह संचारला होता, तो अतिशय महत्वाचा होता. "पाणी अडवा पाणी जिरवा" या मोहिमेची पायाबांधणी झाली. त्यानंतर प्रत्यक्ष कृति आराखडा तयार करून कामाचे योग्य नियोजन करण्यात आले. यासाठी लोकसहभाग जेवढा महत्त्वाचा होता, तेवढाच महत्वाचा आर्थिक सहभाग होता. तो प्रश्न सुद्धा सर्व ग्रामस्थानी एकत्र येऊन मिटवला. 


आतापर्यत या मोहिमेतून श्रमदानाच्या साह्याने जवळपास 10 पेक्षा अधिक बंधारे बांधले असून जेसीबीच्या साहाय्याने नदी प्रवाहात 15 ठिकाणी खोलीकरण करण्यात आली आहे. अशीच कामे गावाच्या आजूबाजूला असलेल्या 2 नदी  नाल्यांमध्ये पाऊस सुरु होई पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. तसेच सर्व गावकरी मिळून 1 जुलैला सामूहिक वृक्षरोपण करणार आहेत. आसपासचे गावे सुद्धा सुजलाम सुफलाम व्हावीत यासाठी सांगवीकरांनी पंचक्रोशीतील गावांना अशा प्रकरचा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...