आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निधी खर्चाचे नियोजन; पावसाळ्यानंतर कामे शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा परिषदेला चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामांसाठी १२० कोटींचा निधी मिळणार अाहे. त्या शिवाय जिपच्या सेसफंडात ३५ कोटींचा निधी आहे. या निधीतून काेणत्या याेजनांवर खर्च करावे, याच्या नियाेजनासाठी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या दालनात नियाेजन बैठके अायाेजित केली हाेती. पदाधिकारी व सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नियाेजन केले अाहे. निधी खर्चाचे प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. कामांच्या याद्या ही मंजुरी मिळाल्यानंतर १ महिन्यांत सादर केल्या जाणार अाहेत. 


अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अायाेजित बैठकीला सीईअाे शिवाजी दिवेकर, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, दिलीप पाटील, रजणी चव्हाण व सर्व विभाग प्रमुख उपस्थित हाेते. प्रत्येक विभागासाठी नियाेजन समितीने नियत्वे ठरवून दिले असून त्यात प्रत्येक विभागाला निधीचे प्रस्ताव तयार करून ते २५ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार अाहेत. प्रत्येक विभाग प्रमुखांनी खर्चाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या अाहेत. 


वर्क कॅलेंडरनुसार नियोजन 
गत वर्षी जि.प. सदस्यांमध्ये निधीवरून वाद निर्माण झाल्याने डिसेंबरपर्यंत नियोजन झाले नव्हते. उशिरा सुरू झालेल्या प्रक्रियेमुळे यंत्रणेचा वेळ वाया गेला. सीईअाे दिवेकर यांनी यावर्षी कामांच्या नियोजनासाठी वर्क कॅलेंडर आखले असून त्यानुसार बैठकीत चर्चा केली. प्रत्येक विभागात विविध हेडवर कसा निधी आहे. त्यात कोणती कामे घेण्यात येतील, यानुसार चर्चा झाली. तसेच प्रस्ताव तयार झाल्यानंतर ते सर्वसाधारण सभेत मंजूर करून एक महिन्याच्या आत कामांच्या याद्या प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या. 


समाज कल्याणचे नियोजन नाही 
समाज कल्याण विभागाच्या कोणत्या योजन घ्यावयाच्या आहेत, याबाबत शासनाकडून विभागीय आयुक्तांना सूचना येणार आहे. येत्या आठवड्यात त्या योजनांची माहिती आली की त्याचे नियोजन केले जाणार आहे. पदाधिकाऱ्यांनी कामांच्या याद्या तात्काळ सादर केल्यास कामांना तात्काळ प्रशासकीय, तांत्रिक मान्यता देणे व त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविणे सोईचे होईल, असे सीईओ दिवेकर यांनी बैठकीत सांगितले. याद्या प्राप्त झाल्यानंतर ही प्रक्रीया पूर्ण करून पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचे दिवेकर यांनी सांगितले.