आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्याचा खून, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; दुचाकीचा कट मारल्यावरून वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - देवपुरातील चंदननगरमध्ये राहणाऱ्या प्रशांत ऊर्फ सनी साळवे या दहावीच्या विद्यार्थ्याचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. एवढेच नव्हे, तर जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल करत असतानाच मारेकऱ्यांनी त्याच्यावर पुन्हा हल्ला चढवला. त्यामुळे, सनीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

 

मात्र,  पोलिसांनी लागलीच सुत्रे हलवत तीन संशयितांना अटक केल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातलगांनी स्वीकारला. याप्रकरणी सुमारे २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.    
चंदननगर परिसरात राहणाऱ्या सागर राजेंद्र साळवे व गुड्ड्या फुलपगारे यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी दुचाकीचा कट लागण्यावरून वाद झाला होता. याच वादाच्या कारणावरून दादा फुलपगारे, गुड्ड्या फुलपगारे, जितू फुलपगारे, गणेश फुलपगारे, दीपक फुलपगारे, वैभव गवळे व इतर १५ ते २० जणांच्या टोळक्याने सनी ऊर्फ प्रशांत प्रकाश साळवे (१६) याला अडवले. तसेच जितूने त्याच्या हातातील गुप्तीने सनीच्या पोटावर वार केले. 

 

या घटनेत गंभीर जखमी सनीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरही रुग्णालयाच्या आवारात मारेकऱ्यांनी पुन्हा सागर साळवे, सुमीत अनिल सूर्यवंशी, सौरभ वसंत साळवे यांच्यावर चॉपर, गुप्ती, तलवार, रॉड, लोखंडी पाइप व फायटरने हल्ला चढवला. हा प्रकार काल बुधवारी रात्री घडला. त्यानंतर गुरुवारी पहाटे प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दखल झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सनीचा मृत्यू झाला.  घटनेनंतर संशयित वैभव गवळे, वैभव कासार आणि गोपाल चौधरी यांना अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...