आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड्यावर धाड, 21 जणांना घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नवीन बीजे मार्केट समाेरील बाबा प्लाझा या इमारतीत शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील पावणे दाेन लाखांच्या चार दुचाकींसह १६ हजार ६५० रूपये राेख रक्कम जप्त करण्यात अाले आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री १२.३० वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कामकाज सुरू होते.

 

शहरात बेधडकपणे अवैध धंदे सुरू असल्याची अाेरड गेल्या काही दिवसांपासून हाेत अाहे. या संदर्भात पोलिसांना माहितीगाराने शुक्रवारी रात्री दिलेल्या माहितीवरून प्रशिक्षणार्थी डीवायएसपी धनंजय पाटील व त्यांच्या पथकाने न्यू. बी. जे. मार्केटजवळ असलेल्या बाबा प्लाझा या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या वेळी २१ जणांना जुगार खेळत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. राेख रकमेसह त्यांच्याकडून चार दुचाकी तसेच १७ मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतले अाहेत. या प्रकरणी रात्री १२.३० वाजेपर्यंत जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यामुळे अवैध धंदेवाल्यांना धडकी भरली अाहे.