आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यातील 3 एटीएम फाेडले; 7.5 लाख रुपये लांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे यावल येथील फोडलेले एटीएम, उजवीकडे धानोरा येथे गॅस कटरच्‍या साहय्याने कापलेले एटीएम. - Divya Marathi
डावीकडे यावल येथील फोडलेले एटीएम, उजवीकडे धानोरा येथे गॅस कटरच्‍या साहय्याने कापलेले एटीएम.

जळगाव - जिल्ह्यात चोरट्यांनी भुसावळसह तीन ठिकाणी शनिवारी एटीएम फाेडले. त्यातील तब्बल साडेसात लाखांची राेकड लंपास झाली. पोलिसांनी श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यात अपेक्षित यश मिळाले नाही.

 

भुसावळात पंचमुखी हनुमान मंदिरासमोरील सुरक्षा रक्षक नसलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी पहाटे २.५८ ते ३.१६ या काळात घडली. चोरांनी अवघ्या १८ मिनिटात गॅस कटरने एटीएम कापून ३ लाख १४ हजार १०० रुपयांची राेकड लांबवली. विशेष म्हणजे एटीएम फोडल्यानंतर पसार होण्यासाठी चोरट्यांनी एटीएमच्या परिसरातून चोरी केलेली महिंद्रा मॅक्स गाडी वापरली. चोरट्यांनी एटीएम केंद्रात प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेरे ताेडले. त्यामुळे त्यांच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या नाहीत.

 

धानाेरा, किनगावातही डल्ला : चाेपडा तालुक्यातील धानाेरा येथेही चोरट्यांनी सेंट्रल बँकेचे एटीएम फाेडले. त्यातील ३ लाख ६३ हजार १०० रुपयांची राेकड लांबवली. डल्ला मारून चोरट्यांनी जाताना शटर बंद केले हाेते. मात्र, सायरन सातत्याने वाजत असल्याने ही घटना उजेडात अाली. यावल तालुक्यातील किनगावातही टाटा इंडिकॅशचे एटीएम फाेडून चोरट्यांनी ७५ हजारांची राेकड लांबवली. भुसावळ, धानाेरा, किनगाव या तिन्ही ठिकाणचे एटीएम गॅस कटरने कापून राेकड लंपास झाली अाहे.

 

चोरट्यांचे टार्गेट एटीएम
गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी एटीएम केंद्रांना टार्गेट केले अाहे. १९ नोव्हेंबर २०१७ राेजी नशिराबाद येथील एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून सहा लाख रुपये लांबवले हाेते. ९ जानेवारी राेजी जळगावातही एटीएम मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पाच दिवसांत जिल्ह्यात तीन एटीएम फाेडण्यात अाले हाेते. यामुळे अाता एटीएम केंद्र सुरक्षित राहिलेले नाही. काही ठिकाणी सुरक्षारक्षक असतानाही एटीएममधून पैसे लांबवले गेले अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा धनोरा व यावल येथील फोडलेल्‍या एटीएमचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...