आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाच्या धडकेत भाेईटेनगर रेल्वेगेट पुन्हा तुटले; अर्धा तास वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- समांतर बाेगद्यांचे काम सुरू करण्यात अाल्यामुळे बजरंग बाेगदा बंद करण्यात अाला अाहे. त्यामुळे भाेईटेनगर रेल्वेगेटवर परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची संख्या प्रचंड वाढली अाहे. साेमवारी दुपारी २.३० वाजता रेल्वेगेट उघडल्यानंतर वाहनधारकांची बाहेर पडण्यासाठी प्रचंड चढाअाेढ सुरू झाली. याच घाईत पिंप्राळाकडे जाणाऱ्या रिक्षाचालकाने गेटला जाेरदार धडक दिल्याने ते तुटले. त्यामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प झाली हाेती. रेल्वे प्रशासनाने तातडीने गेट दुरुस्त केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली अाहे. याप्रकरणी रेल्वे पाेलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले अाहे.


ही घ्या काळजी
- गेट उघडण्याची प्रतीक्षा करावी.
- रेल्वेगेट ओलांडताना घाई करू नये.
- सिग्नल मिळताच वाहने थांबवा.
- रेल्वेच्या अारपीएफने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा.
- शक्य असले तर शिव काॅलनी, राष्ट्रीय महामार्गाचा वापर करा.
- शासकीय मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

बातम्या आणखी आहेत...