आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी 23 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम थांबवली; आतापर्यंत 634 कोटी 17 लाखांची कर्जमाफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांची रक्कम बँकांनी थांबवली (अॉन होल्ड) आहे. शेतकरी दीड लाख रुपयांवरील थकबाकी बँकेत जमा करीत नाहीत, तोपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिसेल मात्र, जमा होणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे आदेश शासनाने बँकांना दिले आहेत. 


या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. 


दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने ओटीएस योजना जाहीर केली होती. मात्र, दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या २३ हजारावर शेतकऱ्यांनी दीड लाख रुपयांवरील थकबाकीची रक्कम बँकेत जमा केलेली नसल्याने त्यांची कर्जमाफीची रक्कम थांबवण्यात आली आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम दिसते, मात्र बँकांकडून ती प्रत्यक्षात जमा करण्यात आलेली नाही.

 

 

थकीत रकमेवरील व्याजासाठी तगादा
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना थकीत रकमेवर व्याज आकारण्यात येऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. मात्र,बँका थकीत रकमेवरील व्याज शेतकऱ्यांकडून आकारत आहेत. या थकीत रकमेवर व्याज न आकारण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे लेखी आदेश प्राप्त नसल्याचे कारण समोर करण्यात येत आहे.

 

 

जळगावात साडेसहाशे कोटींची कर्जमाफी

 

जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीसाठी २ लाख ४६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यापैकी २ लाख २४ हजार ९१६ शेतकऱ्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आल आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ८३ हजार ५६२ शेतकऱ्यांना ६३४ कोटी १७ लाखांची कर्जमाफी मिळालेली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या कर्जमाफीचा आकडा समोर आलेला नाही. त्याबाबत प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नाही.

बातम्या आणखी आहेत...