आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारू विकणाऱ्या तरुणावर चाॅपर हल्ला, पूर्ववैमनस्यातून तिघांची मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - खडकेचाळ परिसरातील मुख्य रस्त्यावर अवैध दारु विक्री करणाऱ्या एका तरुणावर तीन जणांनी चॉपरने हल्ला केल्याची घटना सायंकाळी ५.३० वाजता घडली. रक्तबंबाळ अवस्थेत जखमी तरुणाने थेट शहर पोलिस ठाणे गाठले होते. तेथून त्याला उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले.

 

मुकेश मधुकर पाटील (वय २८, रा.गेंदालाल मिल परिसर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याचे खडकेचाळ परिसरात मुख्य रस्त्यावर अवैध दारु विक्रीची टपरी आहे. दरम्यान, पावती फाडण्याच्या वादातून व मागील भांडणाच्या कारणावरून दीपक वाणी उर्फ पल्या, कुणाल व मोनल (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांनी या ठिकाणी येऊन त्यांच्याशी वाद घातला. या वादातून दीपक याने लोखंडी रॉड व चॉपरने मुकेशवर हल्ला केला. मुकेशला तिघे मारहाण करीत असल्याचे पाहताच त्याचा भाऊ राकेश याने दारुच्या हातागाडीकडे धाव घेतली. या हल्ल्यात मुकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून राकेशने त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल केले.

 

पूर्ववैमनस्यातून झाला वाद
पूर्ववैमनस्यातून दीपक वाणी, कुणाल व मोनल या तिघांनी मुकेश याच्यावर हल्ला केला. मागील काही दिवसांपूर्वी मुकेश व दिपक यांच्यात वाद झाला होता.

बातम्या आणखी आहेत...