आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनामीप्रकरणी दमानिया, मेननविरोधात मुक्ताईनगर न्यायालयाने बजावले अटक वॉरंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात आरोप व बदनामीप्रकरणी दाखल खटल्यात मुक्ताईनगरचे न्यायाधीश आर.एच.मानकर यांनी शनिवारी अंजली दमानिया व आप पक्षाच्या कार्यकर्त्या प्रीती मेनन-शर्मा यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले.   


जावयाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर अंजली दमानिया व प्रीती मेनन-शर्मा  यांनी जळगावात येऊन माजी मंत्री खडसे यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी मुक्ताईनगर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष रमेश ढोले व निवृत्ती पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा   खटला सन २०१६ मध्ये दाखल केला  होता. या खटल्याचे रीतसर समन्स प्राप्त होऊनही दमानिया न्यायालयात हजर होत नव्हत्या. मेनन-शर्मा यांचे वकील मात्र तारखेवर हजर होत होते. हे मान्य नसल्याचे सांगत मुक्ताईनगर येथील न्यायाधीश मानकर यांनी शनिवारी दोघांविरुद्ध अटक वॉरंट बजावले आहे. या खटल्यात फिर्यादीतर्फे अॅड.व्ही .एच. पाटील व अॅड. संतोष सी. टावरी हे  काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...