आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रागात घर साेडलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला नाल्यात; 5 दिवसांपूर्वी सापडली हाेती दुचाकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पत्नीचे वर्षभरापूर्वी अपघाती निधन झाल्याने, निवृत्त हाेऊनही कुठलाही माेबदला न मिळाल्याने अालेल्या वैफल्यातून व कुटुंबीयांसाेबत झालेल्या किरकाेळ वादातून २० दिवसांपूर्वी रागात मनपाचे निवृत्त शिपाई व प्रजापतनगरातील वृद्ध घरातून निघून गेले हाेते. त्या वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रविवारी ममुराबादजवळील हातेड नाल्यात सापडला. परिसरातील शेतकऱ्यांना दुर्गंधी अाल्याने हा प्रकार उघडकीस अाला. दरम्यान, रविवारी संध्याकाळी शवविच्छेदनानंतर सिव्हिल येथूनच त्यांची अंत्ययात्रा काढण्यात अाली. 


प्रजापतनगरात राहणारे व महापालिकेचे निवृत्त शिपाई सुभाष यशवंत मराठे हे रिक्षाचालक मुलगा सचिन मराठे याच्या साेबत राहात हाेते. १२ फेब्रुवारी राेजी त्यांचा घरात किरकाेळ कारणावरून वाद झाला हाेता. त्याचा राग येऊन सुभाष मराठे हे दुचाकी घेऊन निघून गेले हाेते. त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांकडून तपास करूनही परत न अाल्याने २१ फेब्रुवारी राेजी मुलगा सचिन याने तालुका पाेलिसात हरवल्याची तक्रार दिली हाेती. २८ फेब्रुवारी राेजी त्यांची दुचाकी विदगाव येथे बेवारस स्थितीत अाढळून अाली हाेती. रविवारी सकाळपासून ममुराबाद गावातील हातेड नाल्याजवळ असलेल्या शेतकऱ्यांना दुर्गंधी अाली. त्यामुळे त्यांनी अाजूबाजूला पाहणी केल्यानंतर अरुणामायी फार्मसी काॅलेजवळील हातेड नाल्याजवळ मृतदेह दिसला. याविषयी शेतकऱ्यांनी तालुका पाेलिस स्टेशनला माहिती दिली. 


वर्षापूर्वी पत्नीचा मृत्यू 
महापालिकेच्या नाेकरीतून निवृत्त झाल्यानंतर सुभाष मराठे हे नातेवाइकांच्या लग्नकार्यात दुचाकीनेच जात असत. सुमारे वर्षभरापूर्वी पत्नी लताबाई यांना साेबत घेऊन ते भुसावळ येथे लग्नकार्याला जात असताना लताबाई दुचाकीवरून खाली पडल्या, यात त्यांच्या डाेक्याला जबर दुखापत हाेऊन त्यांचा मृत्यू झाला हाेता. 


पालिकेचे पेन्शन न मिळाल्याने हाेते त्रस्त 
सुभाष मराठे हे महापालिकेच्या १७ क्रमांकाच्या शाळेत शिपाई व सुरक्षारक्षक म्हणून काम करत हाेते. ते २-३ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. मात्र, त्यांना अद्यापही पेन्शन व इतर रक्कम मिळालेली नाही. तसेच त्याचा मुलगा सचिन याची खासगी वीज वितरण कंपनीतील नाेकरी गेल्याने अार्थिक अावक कमी झाली हाेती. त्यामुळे अडचणीत वाढल्या हाेत्या. 

बातम्या आणखी आहेत...