आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज खडसेंचा उपाेषणाचा इशारा, जळगाव जिल्ह्यातील डाॅक्टरांच्या रिक्त पदांमुळे संताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - डाॅक्टरांच्या भरतीबाबत गेल्या अडीच वर्षात अाराेग्य मंत्र्यासाेबत चार वेळा बैठक घेतली. अाराेग्य संचालकांना ३० वेळा भेटलाे. उपसंचालकांना ५० पेक्षा अधिक वेळा संपर्क केला. जिल्हा नियाेजन समितीपासून विधानसभेपर्यंत पाठपुरावा केला. परंतु अाराेग्य यंत्रणा हालायला तयार नसल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर अापण उपाेषण करणार असल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बाेलतांना सांगितले. अापले उपाेषण हे सरकार विराेधात नसून नागरिकांच्या समस्याच सुटत नसल्याने असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले.

 

जळगाव सार्वजनिक शिवजयंती महाेत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात अालेल्या अामदार खडसे यांच्या निवासस्थानी महाेत्सवानिमित्त बैठक व पत्रकार परिषद घेण्यात अाली हाेती. या वेळी खडसे बाेलत हाेते. ते म्हणाले, मुक्ताईनगर, बाेदवड अाणि वरणगाव येथील शासकीय रुग्णालयांना बंदचे बाेर्ड लावण्याची वेळ अाली अाहे. अाराेग्य संचालकापासून तर अाराेग्यमंत्र्यापर्यंत प्रत्यक्ष पाठपुरावा करून देखील रुग्णालयात डाॅक्टरांची पदे रिक्त अाहेत. अाराेग्य केंद्रात डाॅक्टर नसल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते.

 

शहरात १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत शिवजयंतीनिमित्त सप्ताह अायाेजित करण्यात अाला अाहे. तसेच भुसावळ येथे शासकीय धान्य गाेदामावर भेट देऊन गैरव्यवहार उघड केला हाेता. याप्रकरणी अहवाल शासनाकडे सादर झाला अाहे. त्यात जबाबदारी निश्चित झालेल्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती अामदार खडसे यांनी दिली. या वेळी भाजपचे अामदार सुरेश भाेळे, शिवसेनेचे अामदार प्रा.चंद्रकांत साेनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित हाेते.


महामार्ग चाैपदरीकरणाचा तरसाेद ते चिखली या टप्प्याला देखील ठेकेदार प्रतिसाद देत नाहीत. अातापर्यंत दाेन ठेकेदारांनी नकार दिला असून सध्या एक ठेकेदार तयार झाला अाहे.शासनाने निधी वाढवून द्यावा किंवा टाेलचे वर्ष वाढविण्याच्या विषयावर चर्चा सुरू अाहे. लवकरच हा विषय मार्गी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

 

दमानियांचे अाराेप बिनबुडाचे
अंजली दमानिया यांनी केलेला एकही अाराेप सिद्ध हाेऊ शकला नाही. सरकारवर विश्वास नसेल तर किमान न्यायालयात तरी पुरावे सादर करा, असे अाव्हान देऊनही दमानियांनी एकही पुरावा सादर केला नाही. माझी अाणि पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी राज्यात २९ ठिकाणी अब्रनुकसानीचे दावे दाखल केले अाहेत. अाराेप करणे हा दमानियांचा उद्याेगच असल्याचेही खडसे या वेळी म्हणाले.

 

१०० काेटी गेले परत
जळगावातील समांतर रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचे नाहीत. ते मनपाच्या मालकीचे अाहे. त्यामुळे त्यावर अाम्ही खर्च करू शकत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे अाता मंजूर झालेला १०० काेटींचा निधीदेखील परत गेल्याचे अामदार खडसे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...