आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी जलाशयात शेतक-यांचे उपोषण, शेतजमिनीत जाण्‍यासाठी रस्‍ता करावा ही मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - स्वमालकीच्या शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता खुला व्हावा, या मागणीसाठी तालुक्यातील ढोरसडे येथील धरणग्रस्त शेतकरी शेतात उपोषणास बसले होते. मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी थेट जायकवाडीच्या पाण्यात उपोषण सुरू केले. रात्री उशिरापर्यंत ते पाण्यात होते.

 

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या गट क्रमांक ५५/२, ५६/२, ५४ पैकी ४९ ठिकाणी शेतजमिनी आहेत. शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करून मिळावा, अशी त्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. रस्ता देता येत नसेल, तर आमच्या शेतजमिनी संपादित करून घ्याव्यात, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शनिवारी तहसील कार्यालयात दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची तहसीलदार दीपक पाटील यांनी चर्चा घडवून आणली. मात्र, काहीच निष्पन्न झाले नसल्याने पाण्यात बसून आंदोलन सुरू करण्यात आले. अनिकेत गोसावी, दत्तात्रेय माळवदे, भगवान काळे यांनी पाण्यात बसून उपोषण सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...