आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणुकीस ५ हजार कर्मचाऱ्यांची गरज; सुमारे ५०० मतदान केंद्र निश्चित हाेण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीसाठी सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार अाहे. यादृष्टीने प्रशासनाने सर्वच शासकीय कार्यालयांकडून कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात अाली अाहे. निवडणुकीसाठी सुमारे ५०० मतदान केंद्र निश्चित हाेण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार अाहे. 


मनपाच्या १९ प्रभागांसाठी अाॅगस्ट महिन्यात निवडणूक हाेेणार अाहे. त्यादृष्टीने प्रशासनाने कामाला सुरूवात केली अाहे. निवडणूक अायाेगाने दुसऱ्या टप्प्यात मतदार यादीचे नियाेजन सुरू केले अाहे. दरम्यान, अायाेगाच्या अादेशानुसार उपजिल्हाधिकारी व तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार अाहे. यासाेबतच पालिका प्रशासनाला मतदान व मतमाेजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार अाहे. यासाठी सर्वच शासकीय कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांची माहितीची जमवाजमव सुरू अाहे. मनपाच्या १९ प्रभागांसाठी प्रत्येक प्रभाग ७५० ते ८०० मतदारांनी जाेडला तरी एकूण मतदारांच्या तुलनेत सुमारे ४५० मतदान केंद्र तयार करावे लागतील. त्यात १० टक्के वाढीव मतदान केंद्रांची व्यवस्था करावी लागणार अाहे. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर किमान १० कर्मचारी नियुक्त केल्यास सुमारे ५००० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 

बातम्या आणखी आहेत...