आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' शिक्षकांवर गुन्ह्याची घाई नकाे, मूळ दाेषींचा शाेध घ्या!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अपंग युनिटमधील शिक्षकांचे समायोजन करताना बाेगस नियुक्त्या दिल्याचे अाढळून अाल्यानंतर त्या बाेगस नियुक्तपत्र मिळालेल्या ९४ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू अाहे. या प्रकरणात नियुक्ती देणारी यंत्रणा, प्रस्ताव पाठवणारे अधिकारी, नाेकरी लावून देणारे एजंट अाणि वरपर्यंत कुणाचे हात अाहेत? याची चाैकशी झाली पाहिजे. संपूर्ण चाैकशी हाेवून मूळ दाेषींचा शाेध घेवूनच त्या सर्वां दाेषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सर्व सभापतींनी साेमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. 


अपंग युनिट प्रकरणात बाेगस नियुक्त देण्यात अाल्या अाहेत. अशा ९४ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रशासनाकडून घाई केली जात अाहे. अपंग युनिट प्रकरणी ग्रामविकास सचिवांकडून कारवाईसाठी अालेल्या पत्रांचा सखाेल अभ्यास केला पाहिजे, त्यात म्हटल्याप्रमाणेच कारवाई झाली पाहिजे. केवळ त्या ९४ शिक्षकांवर गुन्हे दाखल केले म्हणजे प्रकरण संपले असे नाही. मुळात या शिक्षकांना कुठेही नियुक्ती देण्यात अालेली नाही. या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची घाई करण्यापेक्षा या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून मूळ दाेषींना पुढे अाणले पाहिजे. 


मंत्रालयात प्रस्ताव पाठवणे, यादी मंजूर करणे, बाेगस नियुक्तीपत्र देणे, बाेगस स्वाक्षरी करणे, अार्थिक देवाण-घेवाण करणाऱ्या सर्व दाेषींचा पडदा फार्श झाला पाहिजे. केवळ यातील ९४ शिक्षकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यामध्ये जाण्याची भिती अाहे. पाेलिस तपास कसा सुरू हाेईल, याबाबत साशंकता असल्याने जिल्हा परिषदेनेच अापल्या यंत्रणेमार्फत ही चाैकशी करणे अपेक्षीत अाहे. केवळ शिक्षकांवर गुन्हे दाखल करुन काहिही साध्य हाेणार नाही. गुन्हे दाखल करण्याची घाई करण्यापेक्षा सखाेल चाैकशी करावी, अशा सूचना अापण सीईअाे काैस्तुभ दिवेगावरकर यांना दिल्या असल्याचे शिक्षण सभापती पाेपट भाेळे, उपाध्यक्ष नंदकिशाेर महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अध्यक्षा उज्ज्वला पाटील, समाज कल्याण समिती सभापती प्रभाकर साेनवणे, अाराेग्य सभापती दिलीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे उपस्थित हाेते. 


एसीअाेंसाेबत चर्चा 
अपंग युनिट अाणि प्रलंबित कामासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांच्या दालनामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याशी चर्चा केली. अपंग युनिट प्रकरणात सखाेल चाैकशीची मागणी करण्यात अाली अाहे. दरम्यान, सीईअाे काैस्तुभ दिवेगावकर यांच्याविषयी नाराजीबाबत देखील पदाधिकाऱ्यांनी संजय मस्कर यांच्याशी चर्चा केली. या वेळी झालेल्या बंदद्वार चर्चेत अध्यक्षांचे पती मच्छिंद्र पाटील, बांधकाम समिती सभापतींचे पती जे. के. चव्हाण उपस्थित हाेते. 


त्या शिक्षकाला निलंबित करणार 
शाळेतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील 'त्या' शिक्षकाला निलंबित करण्यात येणार असल्याचे शिक्षण सभापती पाेपट भाेळे यांनी सांगितले. त्या शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव मागवल्याची माहिती भाेळे यांनी या वेळी दिली. 

बातम्या आणखी आहेत...