आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा एेकण्यासाठी कार्यकर्ते नसल्याने मंंत्री चंद्रकांत पाटलांनी 20 मिनिटे केली प्रतीक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील यांच्यासाठी जळगाव शहरात अायाेजित केलेल्या प्रचार सभेत श्राेते, कार्यकर्ते नसल्याने वेळेत पाेहाेचलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तब्बल २० मिनिटे कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत थांबून रहावे लागले. जिल्हा पदाधिकाऱ्यांनी फाेना-फाेनी करून शहरातील कार्यकर्ते गाेळा केल्यावर कार्यक्रमातील खुर्च्या भरण्यात अाल्या. समाधानकारक श्राेते दिसल्यानंतर खाली थांबून असलेल्या पालकमंत्र्यांनी व्यासपीठाची पायरी चढली. 


विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी १० वाजता पद्मावती मंगल कार्यालयात शिक्षक मेळावा झाला. मेळाव्यासाठी जिल्हा दाैऱ्यावर अालेले महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सकाळी १०.१५ वाजता पाेहाेचले. परंतु या वेळी मंगल कार्यालयामध्ये खुर्चीवर १६ कार्यकर्तेच बसले हाेते. मंत्र्यांसाेबत अालेले जिल्हाध्यक्ष उदय वाघ, महानगराध्यक्ष अामदार सुरेश भाेळे यांनी तातडीने शहरातील कार्यकर्त्यांना फाेन करून बाेलावून घेतले. अायाेजकांनी देखील मतदार असलेल्या शिक्षकांना प्रचारसभेत येण्यासाठी फाेनवर विनवन्या केल्या; पण ईदची सुटी असल्याने शहरातील शिक्षक मतदारांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. शेवटी शहरातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना फाेन करून सभेसाठी बाेलावून घेतले. सभागृहातील ४० ते ५० टक्के खुर्च्या भरण्याइतपत कार्यकर्ते जमा झाल्यानंतर १०.३५ वाजता जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार सुरेश भोळे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना व्यासपिठावर घेऊन आले.

 

विधान परिषदेत बहुमतासाठी भाजपला ही जागा अावश्यक 
१. लाेकसभा निवडणुका वाऱ्यावर लढल्या जाऊ शकतात; पण विधानसभा अाणि विधान परिषदेला राजकीय कस लागताे. प्रत्येक मताचे महत्त्व असते. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील मतदारांशी यादी घेऊन त्यांच्या संपर्कात रहावे. निवडणुकीचे मायक्राे प्लाॅनींग केले तरच ही निवडणूक अापण जिंकू शकताे. 
२. राज्यात अापले सरकार असले तरी विधान परिषदेमध्ये अापले बहुमत नाही. अनेक विधेयके विधान परिषदेत बहुमत नसल्यामुळे रेंगाळलेली अाहेत. विधान परिषदेत बहुमतामध्ये येण्यासाठी विधान परिषदेच्या अाताच्या चारही जागा महत्त्वाच्या अाहेत. विधान परिषदेत बहुमत मिळाले तर दाेन्ही सभागृहामध्ये भाजपची ताकद राहिल 
३. नाशिक विभागातील जागा जिंकण्यासाठी प्रत्येकाने झाेकून द्या. मी देखील अनेक मतदारांना स्वत: फाेन करणार अाहे. निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक पदाधिकाऱ्यांने मतदारांशी फाेनवर संर्पक साधा. हवेत राहून काम करू नका, प्रत्यक्ष मतदारापर्यंत पाेहचा अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. 

 

बातम्या आणखी आहेत...