आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीसाठी एसटी न थांबल्याने संतप्त पतीने व्यवस्थापकांच्या केबिनला मारल्या लाथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पत्नीला चोपडा येथे जाण्यासाठी जळगाव-शिरपूर बस खोटेनगर बस थांब्यावर हात देऊनही थांबली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने थेट बसस्थानक गाठून आगार व्यवस्थापकाशी हुज्जत घालती. तसेच त्यांच्या केबिनला लाथा मारल्या. यात अागार व्यवस्थापकाचा हात मुरगळल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ८.३० वाजता घडला. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. 


स्वप्नील दत्तात्रय निकम (रा.खोटेनगर, वाटिका आश्रम) यांच्या पत्नीला चोपडा येथे जायचे होते. यासाठी ते पत्नीसोबत खोटेनगर थांब्यावर बसची प्रतीक्षा करीत होते. सकाळी ७ ते ७.३० वाजेदरम्यान जळगाव-शिरपूर बस या मार्गावरून जात होती. निकम दाम्पत्याने बस थांबण्यासाठी हात दिला. त्यानंतरही चालक व वाहकाने बस न थांबवता पुढे निघून गेला. या प्रकरणी निकम यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. स्वप्नील निकम याला बस खोटेनगर थांब्यावर न थांबल्याचा राग आला. त्यामुळे त्याने आगारात येऊन खोटेनगरजवळ थांबा असताना चालक व वाहकाने बस का थांबवली नाही, असे मोठ मोठ्याने म्हणू लागला. आरोळ्याही मारल्या. त्यानंतर माझ्या केबिनला लाथा, बुक्का मारला. यात माझा हात मुरगळला, अशी फिर्याद आगार व्यवस्थापक नीलेश यादवराव पाटील ( वय ३४ रा.मुक्ताईनगर) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. 


हात दाखवा गाडी थांबवा नियमाचा विसर

एसटी महामंडळाने हात दाखवा एसटी थांबवा हे ब्रीद घेऊन सेवा देण्याचा निश्चय केला अाहे; पण या नियमाची बऱ्याचवेळा पायमल्ली हाेत असते. यामुळे प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत असते. याकडे एसटी प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 


'त्या' वाहक, चालकावर कारवाई 
संबंधित प्रवाशाने बस न थांबल्यामुळे आगार व्यवस्थापकाच्या केबिनला लाथा मारून गोंधळ घातला. ही घटना आता घडून गेली आहे. जळगाव-शिरपूर बसवरील चालक व वाहकाने बस न थांबवल्याबाबत चौकशी करण्यात येईल. त्यानंतर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक 

बातम्या आणखी आहेत...