आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंग उडविताना मुख्य विद्युत वाहिनी अंगावर पडून भाजलेल्या ओम पवारचा अखेर मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा- मकर संक्रातीच्या दिवशी घरावरील गच्चीवर पतंग उडविताना अति उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीत पंतग अडकल्याने काढायला गेलेला असताना शॉक बसून गंभीर भाजल्या गेलेल्या ओम नरेंद्र पवार (वय-13) अखेर आज (सोमवार) सकाळी निधन झाले.

 

गोरगावले रोडवरील साने गुरुजी नगरमधील रहिवाशी असलेले व संपूले ता चोपडा येथील आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षक नरेंद्र अभिमन पवार याचा तो मुलगा होता. ओमवर चोपडा उपजिल्हा रुग्णालय, धुळे येथे डॉ बोहरा यांनी त्याच्यावर उपचार केला आणि नंतर संध्याकाळी सहा वाजता नाशिक येथे शताबधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, माज सकाळी आठ वाजता त्याची ओमची प्राणज्योत मालवली.

 

विद्युत वाहिनी अंगावर पडली...

संपूले (ता.चोपडा) येथीलच प्राथमिक शिक्षक गजानन रमेश पाटील यांच्या घरावरील गच्चीवर ओम हा मकर संक्रातीला पतंग खेळत असताना त्याचा पतंगाचा दोरा हा अतिउच्च दाबाच्या विजेच्या तारामध्ये अडकल्याने तो दोरा ताणत असताना अचानक वीज तारा तुटून त्याला अति उच्च दाबाच्या शॉक लागून अक्षरशा गचीवर तो पेटत होता. यावेळी त्याचे वडील नरेंद्र पवार यांनी हातात लाकडी दांडा घेऊन त्याला बाहेर काढले. यावेळी ओम हा खाली कोसळला होता.यावेळी त्याच्या अंगावरील सर्व कपडे जळून खाक झाले होते.

 

पढावद येथे होणार अंत्यसंस्कार...

अमळनेर तालुक्यातील पढावद या ठिकाणी ओम पवार याच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार

या घटनेने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ओम पतंगाचा दोरा ताणताना हायटेन्शन तार कशी तुटली? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...