आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात अॅक्सिस बॅकेचे एटीएम फोडून 3 लाख लांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ-  जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदीरासमोरील अॅक्सिस बॅकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोऱट्यांनी तीन लाख रूपये लांबविल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

 

चोरट्यांनी एटीएम फोडण्यापूर्वी शहरातील एक महिंद्रा मॅक्स गाडी चोरली. गाडीचा वापर चोरीसाठी केल्याची माहिती समोर आली आहे.


पंचमुखी हनुमान मं‍दिरासमोर अॅक्सिस बॅकेचे एटीएम आहे.  रविवारी पहाटे 2 वाजून 48 मिनिटाला वाजता या एटीएमला गॅस कटरने कापून एटीएममधील सुमारे तीन लाख रूपये लांबवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहाणी केली यावेळी दोन भामटे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वीच येथील महाराष्ट्र बॅकेतून 2 लाख 25 हजार रूपये चोरट्यांनी कॅशिअरच्या कॅबीनमधून लांबवले होते. गेल्या आठवड्यात धुळे येथे बॅकेत झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बॅकांना पोलिसांकडून सावधतेच्या सूचना देण्यात आल्या असतांनाही अॅक्सिस बॅकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला. घटनास्थळी सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी भेट देऊन माहिती घेतली, परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. एटीएम फोडून पैसे लांबविण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...