आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा कोरेगाव प्रकरण: अमळनेरमध्ये रेल रोको आंदोलन, नवजीवन एक्स्प्रेस रोखली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- पीपल्स रिपब्लिकन पार्टी अमळनेर यांच्यातर्फ सोमवारी सायंकाळी 4 वाजता नवजीवन एक्स्प्रेस रोखून रेलरोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

 

भीमा कोरेगाव, वडू येथील दंगली प्रकरणी जातीयवादी संघटनेच्या हल्ल्यात जो भीम सैनिकाचा बळी गेला त्याला शासनाकडून 50 लाख रुपये मदत देण्यात यावी. त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सामावून घ्यावे, तसेच खोट्या स्वरूपाचे फौजदारी गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, जातीय दंगलीला कारणीभूत असून ते मोकाट फिरत आहेत, तरी त्यांना शासनाने अभय न देता संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करा व भुसावळ येथील रेल्वे विभागाच्या जागेवर पूर्वीपासून रहिवास प्रयोजनार्थ रहिवासी असलेल्या रहिवाशांना त्याच जागेवर नियमकुल करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

भुसावळ येथील डीआरएम आर.के.यादव यांची बदली अथवा सेवेतून बडतर्फे करण्यात यावे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीत खासगी वाहनांची तोडफोड नुकसान भरपाई शासनाने भरून द्यावी खैरलांजी व नामांतराच्या वेळेस दलितांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याप्रमाणे भीमा कोरेगाव येथील गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्यांसाठी सोमवारी अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस रोखली व घोषणा केली यावेळी आंदोलान कर्त्यांकडून रेल्वेचे अमळनेर विभागाचे विभागीय वाहतूक निरीक्षक एल बी सिंग यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष आगळे, रवींद्र आगळे, सुकलाल खैरनार, महेंद्र आगळे, दिनेश आगळे, आनंद मोहिते, मधुकर आगळे, सुरेखा आगळे, मालूबाई आगळे, मंगलबाई मोहिते, गणेश आगळे, गुलाब कोळी, बापू आगळे, धनराज आगळे, प्रभाकर पाटील, पंडित गायकवाड, सचिन कोळी, विलास कोळी, सुनंदा पानपाटील, रवींद्र वानखेडे, आदी उपस्थित होते.

 

यावेळी पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त तैनात ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख, पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ ढोबळे, पि एस आय लोहरे, रेल्वे चे सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पी एस आय आर आर पाटील, आय पी सिंग, पी एस आय प्रमोद तोमर, यांच्या सह 110 पोलिस कर्मचारी तैनात होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाठा रेल रोको आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...