आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 12 वर्षांनी झाले एसटी बसचे दर्शन; मितावलीच्या गावकर्‍यांना असे केले स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धानोरा- चोपडा तालुक्यातील तापीकाठावरील मितावली गावात तब्बल बारा वर्षानंतर बससेवा सुरु करण्यात आली आहे. गावकरी, विद्यार्थी, अबालवृद्ध यांची होणारी पायपीट ही थांबली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

चोपडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर तापीकाठावर मितावली गाव हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. 2006 पर्यंत गावात बससेवा ही सुरळीत सुरु होती. तरी त्याच वर्षी सातपुडा पर्वतातून मोठे पूर आल्याने मितावली-पारगाव व धानोरा गावांना जोडणारा पूल हा वाहून गेला होता. रस्ताही अत्यंत खराब झाला गेला. यामुळे बस काय साधी मोटारसायकल ही जाऊ शकत नव्हती. याबाबत मितावली, पारगाव रस्ता याबाबत तसेच बस सेवेबाबत येथील सरपंच वैजंताबाई कडू इंगळे, माजी सरपंच रेखा सुनील पाटील, चंपालाल जयसिंग पाटील, नवल इंगळे, कैलास इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी, आगारप्रमुख यांना निवेदन दिले होते.

 

आमदारामुळे बस पुन्हा आली गावात...
धानोरा-पारगाव पुढे मितावली गावाला जोडणारा पूल तसेच धानोरा, पारगाव, कमळगाव रस्ता हा शिवसेनेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने बनला. आणि बसही सुरु झाली. ग्रामस्थांनी आमदार सोनवणे यांच्या प्रयत्नामुळे बस गावात आली असल्याची प्रतिक्रिया दिल्या.

 

बस दिवसातून दोन फेर्‍या करेल. एक बस मुक्कामी मितावली गावातच थांबणार आहे. जळगाव, धानोरा, पारगाव, मितावली कमळगाव असा बसचा मार्ग असेल.


हे तर कर्तव्यच...

मतदार संघातील प्रत्येक गावात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करुन देणे हे माझे कर्तव्यच आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बससेवा सुरु झाली आहे. गावात तब्बल बारा वर्षापासून बससेवा बंद असल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. सुरु झालेली बससेवा कायम सुरु राहील.

- नवल इंगळे, ग्रामस्थ मितावली

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...