आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती शक्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जलसंपदामंत्री गिरीश महाजन अाणि अामचे वैयक्तिक चांगले संबंध अाहेत. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेनेचे संबंध कसेही असले तरी जळगाव महानगरपालिकेत मात्र दाेन्ही पक्षांची युती हाेऊ शकते, असे मत शिवसेनेचे माजी अामदार सुरेश जैन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. साेबतच खाविअा, महाअाघाडी सारखे पर्यायदेखील खुले असल्याची पुस्तीदेखील जाेडली.

 

माजी अामदार सुरेश जैन यांच्या निवासस्थानी 'एसडी-सीड'च्या नव्या उपक्रमाची घाेषणा करण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषदेचे अायाेजन करण्यात अाले हाेतेे. दाेन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव महापालिकेत शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची घाेषणा केली हाेती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शहरातील माजी अामदार जैन यांना पत्रकार परिषदेत विषय विषद केला. शिवसेना चिन्हावर लढेल, भाजपशीदेखील युती करता येईल. खान्देश विकास अाघाडी अाणि महाअाघाडीचेही पर्याय खुले ठेवण्यात अाले असल्याची माेघम राजकीय भूमिका त्यांनी मांडली. यात स्थानिक पातळीवर भाजपचे नेते जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी अापले राजकीय संबंध चांगले असल्याने प्रसंगी महापालिकेत भाजप-शिवसेना युती करण्याचा ही पर्याय त्यांनी बाेलून दाखवला. शिवसेनेकडून पक्षाच्या चिन्हाचा अाग्रह धरला जात असला तरी स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

 

गाळे प्रश्नात लक्ष घालू
गाळे लिलाव प्रक्रियेत न्यायालयाच्या अादेशानुसार कार्यवाही हाेईल; परंतु यातून लवकर मार्ग काढला जावा. महापालिकेवरील कर्जाचा डाेंगर, गाळ्यांची समस्या यातून लवकर मार्ग काढला पाहिजे. यासाठी गाळ्यांच्या विषयात स्वत: लक्ष घालत अाहे. लवकर प्रश्न मार्गी लागावा म्हणून समन्वयाची भूमिका बजावण्यास तयार अाहे. येत्या अाठ-पंधरा दिवसांमध्ये हे प्रश्नदेखील मार्गी लागतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...