आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: 'पद्मावत'ला वाढता विरोध, शहरातील प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त 'पद्मावत'चित्रपटाच्या शहरातील प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चित्रपटाविरोधात राजपूत समाजाने येत्या १९ जानेवारी रोजी 'माँ पद्मावती सन्मान मोर्चा' अायोजित केला असून मोर्चासाठी जिल्हाभरातून राजपूत बांधव सहभागी होणार असल्याचे राजपूत समाज जिल्हा कृती समितीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

 

'पद्मावत' चित्रपट प्रदर्शनास होणाऱ्या विरोधामुळे चित्रपटगृहांचे मालकही धास्तावले आहेत. गेल्या काही वर्षांत चित्रपटांना विविध कारणांमुळे सातत्याने होणाऱ्या विरोधांमुळे चित्रपटगृह,मल्टिप्लेक्स चालक वैतागले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी राजकमल चित्रपटगृहातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत विविध समाज व संघटनांतर्फे चित्रपटांना हाेणाऱ्या विराेधामुळे चित्रपटगृह चालवणे अवघड झाले असून ' पद्मावत' चित्रपटाला विराेध झाल्यास ७० वर्षांचा इतिहास असलेले राजकमल सिनेमागृह १ एप्रिलपासून बंद करण्यात येईल, असे राजकमल सिनेमागृहाचे व्यवस्थापक महेंद्र लुंकड यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे राजपूत समाजाचा मोर्चा व वाढता विरोध पाहता येत्या २६ जानेवारी रोजी शहरात 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित हाेईल किंवा नाही? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून अाहे.

 

तालुकानिहाय आढावा
दरम्यान, माेर्चाच्या पूर्व नियोजनासंदर्भात विविध बाबींवर शनिवारी बैठकीत सखोल चर्चा करून तालुकानिहाय आढावा या वेळी घेण्यात आला. "माँ पद्मावती के सन्मान में सारे क्षत्रिय मैदान में" हे सदर मोर्चाचे ब्रीदवाक्य असून, जिल्ह्यातील बांधव मोठ्या संख्येने यात सहभागी होणार अाहेत,असे कृती समितीने म्हटले आहे.


बैठकीला कृती समितीचे अॅड.आर.बी.पवार, भावलाल पाटील,कैलास पवार, चंद्रशेखर राजपूत, अतुलसिंह हाडा, विनोद शिंदे, रामचंद्र पाटील,पप्पू राजपूत, बापुराव साळुंखे, स्वामी पाटील, नीलेश पाटील, महेंद्रसिंग जाधव,प्रा.डी एस पाटील, गणेश राजपूत, बबलू राजपूत , युवराज राजपूत,पी.जी.पाटील, चेतन महाजन, किशोर महाजन, राजेंद्र पाटील, प्रवीण राजपूत, युवराज राजपूत, गणेश सूर्यवंशी, गौरव बयास, भूषण राजपूत, रोहित पाटील, विशाल राजपूत, बी.सी.पाटील, करण राठोड, रमेश पाटील, शुभम राजपूत, एन एल पाटील, दामोदर राजपूत,सुमेर राजपूत,गणेश राजपूत यांच्यासह तालुकानिहाय प्रतिनिधी उपस्थित होते.

 

शिवतीर्थावरून मोर्चास प्रारंभ
शिवतीर्थ (जी. एस.मैदान) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दुपारी १ वाजता मोर्चास नूतन मराठा महाविद्यालय येथून सुरुवात होईल.त्यानंतर डॉ.सहस्रबुद्धे यांच्या दवाखान्यासमोरून रिंग रोड मार्गे बहिणाबाई उद्यान येथून पुढे क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह चौकात महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व पूजन होईल.तेथून भास्कर मार्केट, स्वातंत्र्य चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा जाईल. त्यानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.

बातम्या आणखी आहेत...