आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दांडी बहाद्दर ७ कर्मचाऱ्यांना दिली नाेटीस; अर्थविभागाचा कनिष्ठ सहायक निलंबित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी साेमवारी सकाळी ११ वाजता कार्यालयातील विविध विभागांना भेटी दिल्याने लेट लतिफ कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. या भेटीमध्ये सीईअाे दिवेकर यांनी रजा न टाकता कार्यालयाला दांडी मारलेल्या ७ कर्मचाऱ्यांना नाेटीस बजावली. तर कार्यालयात येऊनदेखील काेणतेही काम करीत नसल्याची यापूर्वीच तक्रार असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी जागेवरच निलंबित केले. दरम्यान, कार्यालयांच्या पाहणीमध्ये त्यांनी तातडीने दुरूस्त्या, रंगरंगाेटी करण्याचादेखील निर्णय घेतला. 


मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या जुन्या व नवीन इमारतीमधील कार्यालयांना भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन हजेरीपुस्तक, हालचाल नाेंदवही, किरकाेळ रजा नाेंदवही व इतर पाहणी केली. कार्यालयामधील फर्निचर, साफसफाई, लाइट व्यवस्था यासंदर्भात पाहणी केली. कार्यालयात उपस्थित राहत नसलेल्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाईचे अादेश देण्यात अाले. दाेन्ही इमारतीमधील कार्यालयातील इलेक्ट्रिक व्यवस्था दुरूस्त करणे, कर्मचाऱ्यांना चांगली बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे, खराब झालेले फ्लोरिंग, भिंतीची तातडीने रंगरंगाेटी करणे, पार्टिशन, पिण्याचे पाणी, सांडपाणी यांची व्यवस्था करणे, कर्मचाऱ्यांना कामात उत्साह वाटेल, अशी बैठक व्यवस्था करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला सूचना देण्यात अाल्या. जुन्या इमारतीमध्ये बाहेर पडून असलेले रेकाॅर्ड रेकाॅर्डरूमध्ये ठेवण्याच्या सूचना दिल्या. सीईअाेंच्या अचानक तापसणीमुळे कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली हाेती. 


या बाबी अाल्या निदर्शनास 
हालचाल नाेंदवह्या, किरकाेळ रजा नाेंदवह्यांमध्ये अद्ययावत नाेंदी नसणे, अर्जित रजेवर जाण्यापूर्वी रजा मंजूर न करणे, हालचाल नाेंदवहीमध्ये नाेंद न करता इतरत्र जाणे, रजेचा अर्ज कार्यालयात प्राप्त नसताना रजेच्या नाेंदी हजेरीपटावर करणे, वाहन चालकांनी हजेरीपटावर स्वाक्षऱ्या न करणे, अभिलेखे हे अभिलेख कक्षात एेवजी कार्यालयाबाहेरच पडू दिले असल्याचे पाहणीत अाढळून अाले. कार्यालयातच नादुरूस्त, मोडकळीस अालेले फर्निचर, नादुरूस्त संगणक, तत्सम साहित्य पडलेले असल्याचे अाढळून अाले. 


यांच्यावर झाली कारवाई 
अर्थ विभागात कार्यालयात येऊनही कनिष्ठ सहायक मदन हिवरे काम करत नव्हते. वरिष्ठांनी काम सांगितल्यास ते अात्महत्येची धमकी देतात, अशी तक्रार हाेती. सीईअाेंच्या प्रत्यक्ष भेटीत हिवरे काम करत नसल्याचे अाढळल्याने त्यांना निलंबित केले अाहे. त्यांनी अात्महत्येची धमकी दिल्यामुळे शहर पाेलिसांना पत्र िदले अाहे. दरम्यान, गैरहजर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागाचे ३, बांधकाम, अर्थ विभाग, माध्यमिक शिक्षण अाणि अाराेग्य विभागाच्या प्रत्येकी १ अशा ७ जणांना कारणे दाखवा नाेटीस बजावली. 

बातम्या आणखी आहेत...