आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार अन‌् राजकारण्यांना कर्जमाफीची माहिती न देण्याचे राष्ट्रीयकृत बँकांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, याबाबत पत्रकार व राजकारणी व्यक्तींना माहिती न देण्याचे आदेश सरकारने सर्व राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत. ही माहिती खुद्द राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अग्रणी बँकेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रदीप लिलानकर, रिजर्व बँकेचे प्रतिनिधी हेमंत दंडवते, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत बँकांच्या वार्षिक पत आराखड्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मुद्रा लोन, महामंडळाचे कर्जे व इतर कर्ज वाटपाबाबत माहिती देण्यात आली. 


कुणाकडेही नाही कर्जमाफीची माहिती 
जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या दीड लाखावर शेतकऱ्यांना साडे पाचशे कोटीवर कर्जमाफी दिली. मात्र, राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांचा आकडाच समोर आलेला नाही. जिल्हाधिकारी, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे ही राष्ट्रीयकृत बँकांचे सभासद असलेल्या किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, याबाबत आकडेवारी उपलब्ध नाही. दरम्यान, पत्रकार व राजकारणी व्यक्ती यांना कर्जमाफीबाबत माहिती देण्यात येऊ नये, असे आदेश शासनाने राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 


मुद्रा लाेन अंतर्गत ४४१ कोटी कर्ज वाटप 
मुद्रा लोन योजनेंतर्गत जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींना उद्योग करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी ४४१ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. १ लाख ३५ हजार ४०९ व्यक्तींना हे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे प्रभारी महाव्यवस्थापक लिलानकर यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...