आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जेलर' कुंवर यांची तडकाफडकी बदली; कारागृहात बेकायदा वस्तू; कैद्याला मारहाण भाेवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव उपकारागृहाचे अधीक्षक सुनील कुंवर यांची मंगळवारी अाैरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात अाली. तर अाैरंगाबादचे तुरुंगाधिकारी विलास साबळे हे बुधवारी अधीक्षक पदाचा पदभार घेणार अाहेत. कारागृहात बेकायदा वस्तू अाढळणे, कैद्याला मारहाण, बेकायदा रवानगी या गाेष्टी कुंवर यांना भाेवल्या अाहे.

 

नाशिक येथून बदलून अालेल्या सुनील कुंवर यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला हाेता. कुंवर जळगावात रुजू हाेताच ४ ते ५ दिवसात तत्कालीन अधीक्षक डी. टी. डाबेराव हे लाच प्रकरणात निलंबित झाल्याने कुंवर यांना अधीक्षकपदी बढती मिळाली हाेती. ९ जानेवारीला पुण्याच्या पथकाने उपकारागृहाला भेट देऊन तपासणी केली हाेती. यात एका कैद्याजवळ अडीच हजार राेख सापडले होते.

 

तात्पुरता बदली
कुंवर यांच्याबद्दल तक्रारी असलेल्या विविध प्रकरणांची चाैकशी सुरु अाहे. त्यांची अाैरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात तात्पुरत्या स्वरुपात बदली करण्यात अाली अाहे.
- राजेंद्र धामणे, डीअायजी, जेलर प्रशासन

बातम्या आणखी आहेत...