आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: महापालिका निवडणुकीत युतीला खडसेंचा विराेध, 'एकला चलो रे'ची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती शक्य असल्याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत जाहीर केले आहे. जिल्हाध्यक्षांना युती व उमेदवारांबाबत अधिकार आहेत.

 

महापालिकेसंदर्भातील प्रश्नांची अामदार सुरेश भोळे, चंदूलाल पटेल हे स्थानिक नेतृत्व उत्तरे देईल. त्यांना जमले नाही तर महाजन उत्तर देतील. युतीबाबत माझी 'एकला चलो रे'ची भूमिका आहे. तब्येतीमुळे मनपा निवडणुकीत स्वारस्य नाही. आताच्या नेतृत्वाला तडजोड करायची असेल तर अागामी महापालिका निवडणुकीपासून मी अलिप्त राहील, असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले.


गेल्या २५ वर्षांमध्ये मी कधी सरेंडर झालो नाही
मनपा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती शक्य असल्याचे विधान माजी आमदार सुरेश जैन यांनी केले होते. त्यानंतर जलसंपदामंत्री महाजन,आमदार भोळे यांनीही शिवसेना-भाजप युती शक्य असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर खडसे यांना छेडले असता, त्यांनी युतीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच मी निवडणुकीबाबत नेहमी 'एकला चलो रे'ची भूमिका मांडलेली आहे. स्वबळावर लढल्यानेच महापालिकेत भाजपला यश मिळाले आहे. युतीसंदर्भात तथाकथित नेतेच उत्तरे देतील. आताच्या नेतृत्वाला तडजोड करायची असेल तर मनपा निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर आहे. तब्येतीमुळे या निवडणुकीत स्वारस्य नाही. गरज भासली तर मी आहे, असेही खडसे म्हणाले. राजकारणात गेल्या २५ वर्षांमध्ये मी कधीच सरेंडर झालो नाही. संघर्ष सुरूच असून आजतागायत लढतच आहे, असे खडसे म्हणाले.