आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: 'पद्मावत'चे शहरात 2 दिवसांत 32 शाे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वादामुळे बहुचर्चित झालेला महाराणी पद्मावतीच्या जीवनावर अाधारीत 'पद्मावत' हा सिनेमा अखेर जळगाव शहरात शुक्रवारी प्रदर्शित झाला अाहे. पहिल्या दिवशी केवळ एका मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित झाला. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहुन शहरातील तीन सिनेमागृहांनीही सिनेमा प्रदर्शित केला अाहे. दाेन दिवसात चार चित्रपटगृहांमध्ये ३२ शाे प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद लाभत अाहे.

 

महाराणी पद्मावतींच्या इतिहासाचे विकृत प्रदर्शन केल्याच्या आक्षेपावरून राजपूत समाजातर्फे देशभरात या चित्रपटाला कडाडून विराेध करण्यात अाला होता. जळगाव शहरातही राजपूत समाजातर्फे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी घालण्यासाठी अांदाेलन करण्यात अाले हाेते. तसेच चित्रपटगृह चालकांना निवेदन देऊन चित्रपट न लावण्याची विनंती केली हाेती. त्याला प्रतिसाद देत चित्रपटगृह चालकांनी चित्रपट न लावण्याचे जाहिर केले हाेते. त्याच प्रमाणे राणी पद्मावतीच्या सन्मानार्थ 'मांॅ पद्मावती सन्मान माेर्चा'चेही अायाेजन करण्यात अाले हेाते. या सन्मान माेर्चात जिल्हाभरातून हजाराेंच्या संख्येने राजपूत समाजबांधव व महिला सहभागी झाल्या हाेत्या.

 

दरम्यान,गुरुवारी 'पद्मावत' रिलीज झाल्यानंतर चित्रपटात अाक्षेपार्ह असे काहीही नाही नसल्याचे समाेर अाल्याने ठिकठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली. शहरात शुक्रवारी अायनाॅक्स मल्टिप्लेक्समध्ये दुपारी १२ वाजेपासून या चित्रपटाचे शाे सुरु झाले. येथील चारही स्क्रीनवर दिवसभरात १२ शाे दाखविण्यात अाले. विराेध नसल्याचे पाहून अशाेक, मेट्राे सिनेमा व रिगल सिनेमा येथेही शनिवारी चित्रपटाचे संपूर्ण शाे लावण्यात अाले.

 

पहिल्या शाेला गर्दी
शुक्रवारी दुपारपासून चारही स्क्रीनवर पाेलिस बंदाेबस्तात 'पद्मावत' लावण्यात अाला अाहे. पहिल्याच शाेला अडीशेपेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती हाेती. शुक्रवारी १२ तर शनिवारी १६ खेळ दाखवण्यात आले.
- वैभव शहा, व्यवस्थापक, अायनाॅक्स

बातम्या आणखी आहेत...