आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणीच्या अस्मितेसाठी राजपूत समाज एकवटला, \'पद्मावत\' सिनेमाच्‍या विरोधासाठी हजारोंचा मोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महिलांच्या सन्मानाचे व त्यागाचे प्रतीक असलेल्या राणी पद्मावती यांच्या इतिहासाची जाण नव्या पिढीला व्हावी, २५ जानेवारीला प्रदर्शित हाेणाऱ्या 'पद्मावत' चित्रपटाला विराेध दर्शविण्यासाठी शुक्रवारी माँ पद्मावती सन्मान मोर्चा जिल्हा कृतीतर्फे भव्य माेर्चा काढण्यात अाला. यात जिल्हाभरातून हजाराेंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले हाेते. माेर्चाचे नेतृत्व करणाऱ्या समाजातील तरुणींनी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना मागण्याचे निवेदन दिले.

 

मार्चा सुरू हाेण्यापूर्वी दुपारी नूतन मराठा महाविद्यालय कार्यक्रम झाला. या वेळी व्यासपीठावर उपस्थित प्रांजल राजपूत, हर्षाली राजपूत, पूनम राजपूत, संध्या राजपूत, हेमलता राजपूत, तृप्ती राजपूत, लिना राजपूत, रविना राजपूत या तरुणींनी महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ अाणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचे पूजन केले. त्यानंतर या तरुणींनी राजपूत समाजाच्या शाैर्य व पराक्रमाची उज्ज्वल परंपरेबाबत मनाेगत व्यक्त केले.


असंख्य भगवे ध्वज फडकवले
व्यासपीठावर तरुणी तर राजकीय नेते बसले हाेते उपस्थितांमध्ये
ग्रामीण भागातील नागरिकांची उपस्थिती हाेती लक्षणीय.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तरुणांनी केले मानवी मनाेरे.

 

राणी पद्मावतीच्या वेशभूषेत तरुणी
पूनम राजपूत या तरुणीने राणी पद्मावतीची वेशभूषा परिधान केली हाेती. तिने राणी पद्मावतीच्या कार्याची अाेळख पद्यात गाऊन करून दिली. त्यामुळे वातावरणात माेठे चैतन्य निर्माण झाले हाेते. तिच्या कविता वाचनाच्या वेळी युवा वर्गाने अनेकदा महाराणा व राणी पद्मावती यांच्या नावाच्या घाेषणा दिल्या. ही तरुणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात अालेल्या माेर्चाच्या अग्रभागी खुल्या जीपमध्ये राणी पद्मावतीच्या वेशभूषेत उभी हाेती.

बातम्या आणखी आहेत...