आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माँ पद्मावतीच्या सन्मानासाठी जळगावात राजपूत रस्त्यावर; 'पॅडमन'चे प्रदर्शन लांबले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महिलांच्या सन्मानाचे व त्यागाचे प्रतीक असलेल्या राणी पद्मावती यांच्या इतिहासाची जाण नव्या पिढीला व्हावी, २५ जानेवारीला प्रदर्शित हाेणाऱ्या ‘पद्मावत’ चित्रपटाला विराेध दर्शवण्यासाठी शुक्रवारी माँ पद्मावती सन्मान मोर्चा जिल्हा कृतीतर्फे जळगावात भव्य माेर्चा काढण्यात अाला. यात जिल्हाभरातून हजाराेंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले हाेते. माेर्चाचे नेतृत्व तरुणींनी केले.


माेर्चानंतर सभा आयोजित करण्यात आली होती.  या  वेळी  तरुणींनी महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ अाणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचे पूजन केले. समाजातील ज्येष्ठ मंडळींनी शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रागंणातून  २ वाजता माेर्चाला सुरुवात झाली. माेर्चाच्या अग्रभागी तरुणी त्यापाठाेपाठ महिला, ज्येष्ठ नागरिक व त्यापाठाेपाठ युवा वर्ग सहभागी झाले हाेते. रिंगराेड मार्गे माेर्चा बहिणाबाई चाैकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ अाला. या वेळी महापालिकेच्या क्रेनवरून गणेश राणा व सहकाऱ्यांनी महाराणा प्रतापाच्या अभिवादन केले. निवासी जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देत पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, अशी मागणी केली.

 

​मुंबई 'पद्मावत'मुळे आता 'पॅडमन'चे नऊ फेब्रुवारीला होणार प्रदर्शन 

विरोधाच्या पार्श्वभूमीवर  थंडबस्त्यात पडलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा फटका अक्षय कुमार अभिनित ‘पॅडमन’ला बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने ‘पद्मावत’ येत्या २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आधी २५ जानेवारीला प्रदर्शित होण्यास सज्ज असलेल्या ‘पॅडमन’चे प्रदर्शन ९ फेब्रुवारीवर ढकलण्यात आले आहे. ‘पॅडमन’ हा सॅनिटरी नॅपकिनच्या वापरासाठी जनजागृती करणारे तामिळनाडूतील सामाजिक कार्यकर्ते अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आला आहे. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमारने प्रमुख भूमिका साकारली आहे.  १ डिसेंबर २०१७ रोजी निश्चित करण्यात आलेली  ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाची तारीख स्थगित करण्यात आली होती.  ताे अाता २५ जानेवारीला प्रदर्शित हाेईल.दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नीरज पांडे यांनी माघार घेतली.

बातम्या आणखी आहेत...