आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरवर शिर्डीत बलात्कार; आरोपीला अटक करा, भूमाता ब्रिगेडची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - लग्नाचे आमिष दाखवून संगमनेरच्या महिला डॉक्टरवर शिर्डीतील हॉटेल व शासकीय विश्रामगृहात वेळोवेळी बलात्कार झाला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विजय अण्णासाहेब मकासरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस त्वरित अटक करावी, त्याला शासकीय विश्रामगृह कसे दिले गेले याची चौकशी करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

 

फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, विजय मकासरे (मूळ वळण, ता. राहुरी, हल्ली इंदिरानगर, ता. श्रीरामपूर) याची व माझी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने मला लग्नाचे आणि हॉस्पिटल बांधून देतो, असे आमिष दाखवले. आळंदी येथे नेऊन खोटी कागदपत्रे तयार करून लग्न केल्याचा बनाव केला. एक वर्षभर शिर्डीतील शासकीय विश्रामगृह आणि दोन हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला, तसेच मारहाण करून धमकी दिली.


या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप दहिफळे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...