आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादीचे चावडी वाचन करा; अायुक्त चंद्रकांत डांगेंकडे अारपीअायने केली मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत सर्वच प्रभागात घाेळ झाला अाहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक वाॅर्डात मतदार यादीचे चावडी वाचन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडियाने केली अाहे. याबाबत अायुक्त चंद्रकांत डांगे यांना निवेदन देण्यात अाले. मतदार याद्यांमधील नावांचा गाेंधळ प्रचंड वाढला अाहे. 


मतदारांची नावे गहाळ हाेणे, रहिवास नसतानाही मतदारांचा समावेश असणे अादी प्रकार घडले अाहेत. त्यामुळे नवीन व जुन्या मतदारांत संभ्रम निर्माण झाला अाहे. सर्व १९ वाॅर्डात मतदार यादीचे चावडी वाचन केल्यास मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत, असे निवेदन महानगराध्यक्ष अनिल अडकमाेल, उपाध्यक्ष प्रताप बनसाेडे, महिला अाघाडीच्या ग्रामीण महानगराध्यक्षा पूनम संदीप जाेहरे, अानंद गायकवाड, भीमराव बनसाेडे, पृथ्वीराज गायकवाड, सुभाष बनसाेडे, फारुख पठाण यांनी दिले अाहे.

बातम्या आणखी आहेत...