आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​शेवगाव तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ, सहा जणांना मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- शेवगाव तालुक्यातील हातगाव  शिवारातील दोन वस्त्यांवर शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेनंतर आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकत ७२ हजारांचा ऐवज लांबवला. येथील रहिवाशांना लोखंडी रॉड, कुऱ्हाड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर शेवगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  


 जर्कीन, टोपी घातलेले दरोडखोर देविदास साहेबराव गादे यांच्या वस्तीवर आले व त्यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या सिंधूबाई कुंडलीकराव चेडे (५५), पत्नी गयाबाई, वडील साहेबराव, जीवन दत्तात्रय गादे या मुलासह जबर मारहाण केली. यात देविदास यांचा हात मोडला आहे. वस्तीवरून ४८ हजार रुपयांचा ऐवज  लांबवला. त्यानंतर दरोडेखोरांनी बर्गे वस्तीकडे आपला मोर्चा वळवला. दत्तात्रय बापुसाहेब बर्गे (४९), मंदा दत्तात्रय बर्गे (४५) यांच्यावर हल्ला चढवून दोघांनाही जबर जखमी केले. तेथून सुमारे २४ हजारांचे दागिने, मणिमंगळसूत्र इत्यादी वस्तू लांबवल्या. दोघांना शेवगावातील रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वांनी मद्यप्राशन केलेले होते आणि ते हिंदीत बोलत असल्याची माहिती जखमींनी दिली. मारहाणीनंतर जवळपासचे लोक येथे धावून आले त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. परंतु रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...