आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - शिव कॉलनीतील भास्करराव हाउसिंग सोसायटीत राहणारे माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय देवदर्शनासाठी शेगाव येथे गेलेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून ५१ हजार रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिने चाेरुन पाेबारा केला. मात्र, घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतील कपाटाचा दरवाजा चोरट्यांकडून न तुटल्यामुळे दीड ते दोन तोळे सोने सुरक्षीत राहिले.
शिव कॉलनीतील भास्करराव हाउसिंग सोसायटीतील प्लाॅट क्रमांक १६मध्ये राहणारे माजी सैनिक अरूण हिरामण पाटील हे १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता पत्नी, आई व दोन मुलांसह घर बंद करून शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबीय घरी परतले. या वेळी त्यांना त्यांच्या घराची कडी व कुलूप तुटलेले आढळून आले. तर घरात गेल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटे तोडली हाेती.
शेजारी अनभिज्ञ
घटनेनंतर रामानंद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. जी. रोहम घटनास्थळी पोहोचले. या वेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. फिंगरप्रिंट एक्सपर्ट्सनी घरातील कपाट व इतर वस्तुंवरील हाताचे ठसे घेतले आहेत. दरम्यान, शिव कॉलनी उताराला लागून पाटील यांचे घर आहे. घराचे प्रवेशद्वार बंद होते. त्यांच्या घराच्या संरक्षक भिंतीलगत मागच्या बाजूला ही छोटेसे गेट आहे. या गेटमधून संरक्षक भिंतीवरून सहज उडी मारून आत प्रवेश करता येतो. घराच्या दोन्ही बाजूला व मागील बाजूला मोकळी जागा आहे. समोरच्या बाजूने रहिवास आहे. मात्र, शेजाऱ्यांना या घरफोडी विषयी काहीच कळले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.