आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना स्‍वबळावर लढणार- शिवसेना नेते खा. संजय राऊत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा - आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेनेने स्‍वबळाची तयारी सुरू केली असून लोकसभेच्‍या संपुर्ण 48 जागा लढवणार असल्‍याची माहिती शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी दिली. आज दि.12 रोजी चोपडा येथे पार पडलेल्‍या संवाद मेळाव्‍या प्रसंगी ते बोलत होते . यावेळी व्‍यासपीठावर सहकार मंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, आ. चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर जळकेकर, भाऊ चौधरी, सुनील गडकरी, विनोद चव्हाण, तसेच चोपडा तालुक्याचे सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


या वेळी बोलताना ते म्‍हणाले की, येणा-या काळात रावेर व जळगावचा खासदार सेनेचाच असेल. लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुक स्‍वबळावर लढण्‍याची तयारी सुरू असून शिवसेना 150  जागा जिंकेल. भाजपवर टीका करतांना ते म्‍हणाले की , ज्‍या गुजरात राज्‍यामधून पंतप्रधान आले त्‍याच राज्‍यामध्‍ये विधानसभा निवडणूक जिंकण्‍यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागली. तेथे अहंकार आणि पैशाचा पराभव झाला. आज पक्ष सोडलेले एक पटोले दिसत आहेत मात्र येणा-या काळात असे अनेक पटोले बाहेर पडतील अशी टीकाही त्‍यांनी केली. या वेळी ना. गुलाबराव पाटील आणि आ. चंद्रकांत सोनवणे यांचेही भाषने झाली.


पुढील स्‍लाइडवर पाहा, मेळाव्‍याचे आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...