आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी गेलेले तुपाचे डब्बे त्याच कंपनीच्या दुसऱ्या बंद गोदामात सापडले;एक संशयित ताब्यात.

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- येथील प्रितेश ट्रेडिंग कंपनीच्या गोतमातून काही दिवसांपूर्वी चोरीस गेलेले तुपाचे डब्बे त्याच कंपनीच्या दुसऱ्या  बंद असलेल्या गोदामात सापडले. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर आणि पथकाने केलेल्या कारवाईत हि बाब उघड झाली. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


काही दिवसांपूर्वी  प्रितेश ट्रेडींग कंपनीच्या गोदामातून 276 तुपाचे डब्बे किंमत २ लाख ९६७०० रुपयांचा किमतीचा  माल चोरीस गेल्याची तक्रार हितेश प्रकाश शहा यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्त्वात प्रमोद बागडे, किशोर पाटील, सुनील पाटील, सपकाळे, मिलिंद बोरसे, बापू पारधी यांच्या पथकाने याच ट्रेडींग कंपनीच्या बंद असलेल्या गोदामात छापा मारून कारवाई केली. कारवाईत सुमारे १७५  तुपाचे डब्बे हाती लागले आहेत. चोरीच्या संशयावरून या परिसरातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. अमळनेर येथील प्रितेश ट्रेडिंग कंपनीच्या गोतमातून काही दिवसांपूर्वी चोरीस गेलेले तुपाचे डब्बे त्य्याच कंपनीच्या दुसरी बंद असलेल्या गोदामात सापडले. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर आणि पथकाने केलेल्या कारवाईत हि माहिती  हाती लागली. 

काही दिवसांपूर्वी  प्रितेश ट्रेडींग कंपनीच्या गोदामातून 276 तुपाचे डब्बे किंमत २ लाख ९६७०० रुपयांचा किमतीचा  माल चोरीस गेल्याची तक्रार हितेश प्रकाश शहा यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्त्वात प्रमोद बागडे, किशोर पाटील, सुनील पाटील, सपकाळे, मिलिंद बोरसे, बापू पारधी यांच्या पथकाने याच ट्रेडींग कंपनीच्या बंद असलेल्या गोदामात छापा मारून कारवाई केली. कारवाईत सुमारे १७५  तुपाचे डब्बे हाती लागले आहेत. चोरीच्या संशयावरून या परिसरातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...