आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरांचा सुळसूळाट..बॅंक एटीएमवर संक्रांत; गॅस कटरच्‍या मदतीने एटीएम कापून लांबवले लाखो रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे यावल येथील फोडलेले एटीएम, उजवीकडे धानोरा येथे गॅस कटरच्‍या साहय्याने कापलेले एटीएम. - Divya Marathi
डावीकडे यावल येथील फोडलेले एटीएम, उजवीकडे धानोरा येथे गॅस कटरच्‍या साहय्याने कापलेले एटीएम.

जळगाव- मकर संक्रांतीच्‍या पहाटे जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी दोन एटीएम फोडल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गॅस कटरच्‍या मदतीने सेंट्रल बँकेचे एटीएम कापून चोरट्यांनी तब्बल 3 लाख 63 हजार रुपये लांबवले तर यावल तालुक्यातील किनगाव बस स्टॅन्ड परिसरातील टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडण्‍यात आले आहे. यातील 75 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.  

 

अंकलेश्वर- बर्‍हाणपूर महामार्गावरील धानोरा येथे सदगुरु दूध डेअरीच्या शेजारी सेंट्रल बँक आहे. त्याच्याच खाली एटीएम आहे. रविवारी पहाटे पावणे चारच्‍या सुमारास चोरट्यांनी एटीएममध्‍ये प्रवेश केला. प्रथम त्यांनी बाहेरील दोन्‍ही सीसीटीव्ही कँमेरे फिरवले व आतील दोन कॅमेर्‍यांच्या वायरही कापल्‍या. नंतर गॅस कटरच्‍या मदतीने एटीएम कापून चोरट्यांनी 3 लाख, 63 हजार रुपये लांबवले. चोरी करुन चोरट्यांनी नंतर शटरही बंद केले होते.

 

सायरन वाजल्यामुळे घटना समजली
चोरट्यांनी सेंट्रल बँक एटीएम फोडल्यानंतर सायरन वाजत होता. सायरनचा संदेश प्रथम मुंबईला गेला व तेथून शाखाधिकारी यांना याबाबत कळवण्‍यात आले. त्यांनी ताबडतोब धानोरा येथील मिनी बँकेत काम करणारे महेंद्र पाटील यांना घटनास्थळाजवळ पाठवले. तेव्हा एटीएम फोडल्‍याचे लक्षात आले.

 

चोरट्यांनी एटीएमचे शटर बंद केलेले असल्‍याने सायरन वाजला नसता तर ही घटना सोमवारी लक्षात आली असती. चोरीच्या तपासासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार तपास सुरु आहे.


चोरटे सीसीटीव्‍हीत कैद
येथील सीसीटीव्‍ही कॅमे-यात सकाळी 3 वाजून 43 मिनिटांनी एक मार्शल गाडी आली असल्याचे दिसत आहे. त्‍यातून चार चोरटे उतरले व एकाने वर चढत येथील बाहेरील कॅमेरा फिरवला. चारही चोरांनी तोंडाला मोठे रुमाल बांधलेले होते व अंगात स्वेटर घातलेले होते.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, यावलमध्ये टाटा इंडिकॅशचे एटीएम फोडले...

बातम्या आणखी आहेत...