आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचही जणांच्या डोक्यात तीन इंचांचे घाव; ‘अजून येणार का मुले पकडायला’ म्हणत बेदम मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- संतापलेल्या दाेन हजार लाेकांच्या जमावापैकी बहुतांश जणांनी त्या पाचही भिक्षेकऱ्यांना मारहाण करीत फरफटत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अाणले. तिथे अाणेपर्यंत मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा असलेल्या त्या वीस बाय वीसच्या खाेलीत हातात मिळेल त्या वस्तूने पाचही जणांवर निर्दयीपणे वार केले. ‘अजून येणार का मुले पकडायला’, असे म्हणत चौताळलेल्या जमावाने पाचही जणांवर वार केले. डाेक्यात तीन इंचाची जखम हाेईल, इतक्या तीव्र पद्धतीने अमानुष मारहाण केली. त्यात पाच जणांपैकी तिघांनी जागीच जीव साेडला. त्यावेळी सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्यांचे मोबाइलमध्ये शुटींग सुरुच होते. मात्र, अमानुष मारहाणीचा कोणालाच त्यांची दयामया आली नाही.


या हत्याकांडामुळे जिल्हा प्रशासन हादरले अाहे. साक्री तालुक्यातील अतिदुर्गम भागात राईनपाडा वसले अाहे. मुळात या गावापासून पिंपळनेर २५ किलाेमीटर तर नवापूर ४५ किलाेमीटर दूर अाहे. जवळपास फारशी माेठी गावे नाहीत. राेहाेड व टेंभा ही गावे तिथून अाणखी पुढे अाहेत. त्यामुळे राईनपाड्यात काही घडले तर लवकर फाैजफाटा पाेहचणे शक्य हाेत नाही. त्यातच रविवारी या गावचा अाठवडे बाजार हाेता. मुळात हा बाजारही सहा महिन्यापूर्वी सुरू झाला हाेता. या अाठवडे बाजारात परिसरातील अादिवासी वाड्या-पाड्यातील दाेन ते तीन हजार अादिवासी ग्रामस्थ येतात. त्याचबराेबर पिंपळनेर येथील व्यापारीही माल घेवून येतात. रविवारी भिक्षा मागण्यासाठी भाेसले कुटुंबातील पाच जण या गावाकडे निघाले तेव्हा त्यांना इतक्या क्रूरपणे अापण मारले जावू याची कल्पनाही नसावी.


अशी पसरली अफवा
राईनपाडा साधारण एक किलाेमीटर अंतरावर राहिले असेल तेव्हा एक शेतानजीक खेळणाऱ्या मुलांना या पाचही भाेसलेंपैकी एकाने गाव किती लांब अाहे, याची विचारणा केली अन् तिथेच मुले पळवणारे अाल्याची अफवा पसरली. मुले या भिक्षेकऱ्यांना भिऊन पळाली तेव्हा शेतात काम करणाऱ्या अादिवासी ग्रामस्थांनी या भिक्षेकऱ्यांचा माग काढायला सुरूवात केली. गावानजीक हे पाच जण येईपर्यंत ते मुले पळवणारे असल्याची बाेंब फुटली. बाजारात त्याची तातडीने अफवा पसरली. त्यामुळे या पाचही जणांना काही जणांनी अाधी जाब विचारला व नंतर मारहाण केली.

 

राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेसमोरच ग्रा.पं.मध्ये रक्ताचे थारोळे
तीष्ण वस्तूने केलेल्या मारहाणीत तीन जणांच्या डाेक्यात तीन इंचाच्या जखमा झाल्या. त्याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेसमोरच रक्ताचे थाराेळे साचले होते.  तिघा जणांनी जागीच जीव साेडला. तरीही त्यांना हाेणारी मारहाण थांबली नव्हती. दाेघे जण गंभीर जखमी हाेते. त्यांना उपचारासाठी हलवण्यात अाले. मात्र त्यांचाही रस्त्यातच मृत्यू झाला. पोलिसांना घटना कळल्यावर पिंपळनेर पाेलिस घटनास्थळी पाेहचले. तेव्हा राईनपाड्याच्या गावकऱ्यांनी त्यांच्याशीही हुज्जत घातली. मात्र पाेलिसांची संख्या ताेकडी हाेती. त्यामुळे तातडीने धरपकड झाली नाही. पाेलिसांची कुमक मागवण्यात अाली, तेव्हा राईनपाड्यातील गावकरी पसार झाले. गावात केवळ महिला व मुले उरली हाेती. गाव भकासलेले दिसत हाेते. जिथे काही तासांपूर्वी मृत्यूचे तांडव झाले तिथे स्मशान शांतता झाली.

 

पुढील स्लाइडवर पाहा इतर तिघांचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...