आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या स्मृतिदिनाला अन्नदानाएेवजी वृक्षाराेपण; प्रा. किशाेर सानपांनी जगवले २१ वृक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त अन्नदान करण्याएेवजी वृक्षाराेपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा वसा माेहाडी रस्त्यावरील प्रा. किशाेर वासुदेव सानप यांनी जाेपासला अाहे. लावलेली २१ राेपटे उन्हाळ्यात काेमेजू नये म्हणून त्यांनी ठिबक केले. घराच्या टाकीतून कनेक्शन देऊन ती जगवली अाहेत. 


नूतन मराठा महाविद्यालयात सेवारत प्रा. किशाेर सानप यांचे शहरातील माेहाडी रस्त्यावर घर अाहे. त्यांच्या वडिलांचा स्मृतिदिन ९ सप्टेंबरला असताे. त्यांच्या माेठ्या भावाचे (रवी सानप) मित्र व भारती पर्यावरण संस्थेचे सदस्य गणेश काेकाटे यांच्याशी प्रा. सानप यांची भेट झाली. या भेटीत काेकाटे यांनी त्यांना वडिलांच्या स्मृतिदिनी अन्नदान, फळवाटप करण्यापेक्षा वृक्षलागवड व संर्वधनाचा सल्ला दिला. प्रा. सानप यांना झाडांची अावड अाहे. त्यांनी चाेपडा तालुक्यातील हातेड महाविद्यालयात सेवेत असताना २०० वृक्ष लावून संवर्धन केले हाेते. त्यामुळे त्यांना हा सल्ला अावडला. त्यांनी या उपक्रमाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करण्याचे ठरवले. 


गेल्या वर्षी त्यांनी घराच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर रस्त्यावर अाेळीने २१ वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते लागवड केली. या वृक्षांच्या संवर्धनासाठी ट्री-गार्ड लावून त्यावर वडिलांच्या स्मृती जाेपासल्या. उन्हाळ्यात लावलेली राेपटे काेमेजू नये म्हणून काकांच्या शेतातून जुन्या ठिबक नळ्या अाणून प्लंबरच्या मदतीने ठिबक करून ला घराच्या टाकीतून कनेक्शन दिले. ही राेपटे वर्षभरात ७ ते ८ फूट उंचीची झालेली अाहेत. त्यांनी दरवर्षी २१ राेपटे लावण्याचा संकल्प केला अाहे. 


पालिका कर्मचाऱ्याचा सावतानगरात उपक्रम
महापालिकेच्या किरकाेळ वसुली विभागात कार्यरत वसंत पाटील हे शेतकी शाळेमागे संत सावतानगरात राहतात. तेथे दीड वर्षापूर्वी केवळ १५-२० घरे हाेती. हा परिसर उजाड हाेता. उन्हाळ्यात तेथे उन्हाची तीव्रता अधिक जाणवायची. त्यावर उपाय म्हणून वसंत पाटील यांनी खान्देश माळी महासंघाच्या माध्यमातून स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी ४० वृक्षांचे मान्यवर व स्थानिक नागरिकांच्या हस्ते वृक्षाराेपण केले. यासाठी ४ ते ५ फूट उंचीच्या राेपांची निवड केली. त्याला ट्री -गार्ड लावले. वृक्षाराेपणासाेबतच संवर्धनाची जबाबदारी उन्हाळ्यात पार पाडल्याने सर्व राेपटे जगली अाहेत. त्यांना परिसरातील नागरिकांनी साथ दिली अाहे. अाता वस्ती वाढली असून संत सावतानगर हिरवेगार करण्याचा संकल्प नागरिकांनी केला अाहे. यंदा ते १ हजार वृक्षांची लागवड या परिसरासह शहरात करणार अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...