आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण: सीईअाेंपाठाेपाठ अाता अध्यक्ष बदलाच्या राजकीय हालचाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सत्ता स्थापन हाेऊन वर्ष उलटले तरी देखील जिल्हा परिषदेत राजकीय स्थैय मिळत नसल्याने भाजपच्या गाेटातून अाता थेट अध्यक्ष बदलाच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या अाहेत. सीईअाे काैस्तुभ दिवेगावकर यांच्या तडकाफडकी बदलीनंतरही जिल्हा परिषदेतील वाद कायम असल्याने अाता सदस्यांचा माेर्चा अध्यक्षांकडे वळला अाहे. अध्यक्षांवर अविश्वासाची कायदेशीर अडचण असल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत. 


जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजप दाेन गटांमध्ये विभागली गेली अाहे. प्रारंभीच्या सहा महिन्याच्या कार्यकाळात अध्यक्षाबद्दल एका गटाची नाराजी हाेती. अलीकडे मात्र दुसऱ्या गटाने देखील अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली अाहे. काेणत्याही गटाशी संबधित नसल्याने अध्यक्ष उज्वला पाटील यांची मात्र राजकीय काेंडी हाेत असल्याची स्थिती अाहे. जिल्हा परिषदेतील वादावर असलेले लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सीईअाे काैस्तुभ दिवेगावकर यांची अवघ्या १० महिन्यात बदली करून त्यांचा राजकीय बळी घेण्यात अाला. या बळीनंतर किमान जिल्हा परिषदेत राजकीय स्थैय निर्माण हाेण्याची भाजप नेत्यांच अपेक्षा फाेल ठरली अाहे. 


सीईअाेंच्या बदलीनंतर देखील जिल्हा परिषदेतील राजकीय संघर्ष, गटबाजीला अधिक खतपाणी मिळत असल्याची स्थिती अाहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या गाेटातील काही सदस्यांनी अापल्या गटाचा अध्यक्ष असावा म्हणून पवित्रा घेतला अाहे. एकहाती सत्ता असल्याने विकासकामांना गती येईल अशी पुश्ती यामागे जाेडली जात अाहे. दरम्यान, अाेबीसीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या दाेन्ही गटातील इच्छुकांकडून पुढची माेर्चेबांधणी केली जात अाहे . 


राजीनाम्यासाठी दिला निराेप 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील यांचे पती तथा माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी यापूर्वी पाराेळा-एरंडाेल मतदारसंघात विधानसभेची उमेदवारी केली अाहे. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र माेंदीनी देखील जाहीर सभा घेतली हाेती. त्या पार्श्वभूमीवर या वेळी देखील मच्छिंद्र पाटील हे विधानसभेच्या उमेदवारीचे दावेदार अाहेत. त्यांनी मतदरासंघात पूर्णवेळ तयारीसाठी देणे अावश्यक असल्याने त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून त्यांना पक्षाकडून निराेप देण्यात अाला अाहे. विधानसभेच्या तयारीच्या अाडून त्यांचा राजीनामा मागितला जात अाहे. 


उमेदवारी मलाच; पण पक्षाचा निराेप नाही 
मी पूर्णवेळ मतदासंघात तयारी करीत अाहे. जिल्हा परिषदेत मिळालेल्या सेस फंडाचा निधी स्वत: एेवजी इतर गटांमध्ये टाकला अाहे. मतदारांच्या सतत संपर्कात असून उमेदवारी अापल्यालाच मिळणार अाहे; परंतु यासंदर्भात पक्षाने अापल्याला तसा काेणताही निराेप दिलेला नाही. 
- मच्छिंद्र पाटील, पराभूत उमेदवार, पाराेळा विधानसभा मतदारसंघ 

बातम्या आणखी आहेत...