आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुअा प्रकरणी न्यायाची मागणी करण्यासाठी गेले, परतताना अपघातात दोन तरूणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- कठुअा बलात्कारप्रकरणी अाराेपींना कठाेर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी पाळधीचे तीन तरूण जामनेर पाेलिस ठाण्यात गेले हाेते. तेथून घराकडे परत येताना त्यांच्या दुचाकीला बुधवारी मॅटेडाेअरने धडक दिली. त्यात दाेघे ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. 


जामनेर तालुक्यातील पाळधी येथील सादिक हकीम तडवी (वय २०), शाहरूख इब्राहीम तडवी (वय २१) व सिकंदर बाबू तडवी हे तिघे दुचाकीने जामनेरकडे सकाळी ११ वाजता निघाले. जम्मू काश्मीरमधील अासिफा या बालिकेवर पाशवी अत्याचार करणाऱ्या अाराेपींवर कठाेर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन त्यांनी पाेलिसांना दिले. त्यानंतर पहूरकडून पाळधीकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला जळगावहून अजिंठ्याकडे जाणाऱ्या मॅटेडाेअरने धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. प्रथमाेपचार करून जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. शाहरूख इब्राहीम तडवी व सादीक हकीम तडवी या दाेघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर सिकंदर बाबू तडवी या गंभीर जखमीवर उपचार सुरू अाहेत. दुचाकीस्वारांना धडक देऊन पसार हाेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाला ट्रकसह पहूर गावापासून एक किलाेमीटर अंतरावर पकडण्यात अाले. त्याला पहूर पोलिसांनी ताब्यात घेतले. 

बातम्या आणखी आहेत...