आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविप्र'त नरेंद्र पाटलांच्या संचालक मंडळाचे चार महिन्यांनंतर कामकाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेत वैध संचालक मंडळावरून सुरू असलेल्या दाेन गटांच्या वादात पाेलिसांनी चार महिन्यांपासून संचालक मंडळाला संस्थेत प्रवेश नाकारून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला हाेता. त्यात तालुका दंडाधिकाऱ्यांनी सहकार कायद्यानुसार निवडणुका हाेऊन निवडून अालेले नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळ वैध असल्याचा निर्णय दिला अाहे. या निर्णयानुसार नरेंद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळाने १७ जून राेजी संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करून कामकाज सुरू केले. 


सत्याचा विजय, शैक्षणिक सुविधांवर लक्ष केंद्रित करू : नरेंद्र पाटील 
तहसीलदारांनी १२ जून राेजी अादेश काढल्यानंतर नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाने १७ जून राेजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करून कामकाजाला प्रारंभ केला. पाेलिसांनी त्यांना विचारले असता त्यांनी तहसीलादारांचे पत्र पाेलिसांच्या हाती ठेवून कार्यालयात प्रवेश केला. या वेळी घेण्यात अालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्याने साेमवारपासून शैक्षणिक सुविधांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी संचालक अॅड. विजय पाटील, हेमंतकुमार साळुंखे, दीपक सूर्यवंशी, डाॅ. भालेराव साठे, महेश पाटील, हरिचंद्र पाटील, मनाेहर पाटील, अानंदा कापसे, डाॅ. सतीश देवकर, अॅड. भरत पाटील, संजय पवार, प्रतिभा शिंदे, विनाेद देशमुख, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे उपस्थित हाेते. दरम्यान, गेल्या चार महिन्यात संस्थेत संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय काही निर्णय, चुकीचे कामकाज झाले असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संचालक मंडळाने दिला. 

बातम्या आणखी आहेत...