आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदनामीच्या भितीने युवकाने केले Suicide, विषारी औषध सेवन करुन संपविले जीवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- अमळगाव येथील तरुण शेतकरी आत्महत्या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अमळगाव ता अमळनेर येथील तरुण शेतकरी चंद्रशेखर माधवराव पाटील याने दि 19 मे रोजी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्याचा काल उपचारादरम्यान धुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. 

 

याप्रकरणी आज मारवड पोलिसात मयताचे वडील माधवराव बुधा पाटील यांचा फिर्यादीवरून भरत चिंतामण कोळी ,सतीश युवराज कोळी, सुनील रामकृष्ण कोळी, अविनाश देविदास आगळे सर्व रा अमळगाव ता अमळनेर यांचविरुद्ध भा द क  306 ,323,504 ,506/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व सर्व संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली.
    

याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत चंद्रशेखर पाटील याने आरोपी भरत कोळी याच्या पत्नीला दि 18 रोजी डोळा मारला. याचा राग येऊन दि 18 रोजी दु 2.30 वा फिर्यादीचा घरासमोर व सायंकाळी 7.30 ला फिर्यादीचा खळ्यात आरोपींनी मारहाण केली यामुळे बदनामीचा भितीने त्याने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...