आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: आई-वडील रागावतील या भीतीमुळे केले विषप्राशन, मुलाने गमावला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दुचाकी चालवत असताना दुसऱ्या मुलास धक्का लागल्याने आई-वडील रागावतील या भीतीने १४ वर्षीय मुलाने कीटकनाशक सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना किनगाव (ता. यावल) येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता घडली. याप्रकरणी यावल पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे. 

किनगाव येथील चेतन संजय पाटील (वय १४) याचे अाईवडील मंगळवारी सकाळी शेतात गेले हाेते. तर माेठा भाऊ गाैरव हा शाळेत गेलेला हाेता. एकटाच घरी असलेला सचिन सकाळी गल्लीत दुचाकी फिरवत हाेता. त्या वेळी सात वर्षांच्या मुलाला दुचाकीची धडक लागून ती त्याच्या अंगावर पडली. यात सचिन लहान मुलगा जखमी झाला. दुचाकी फिरवताना लहान मुलाला लागल्यामुळे आईवडील आपल्याला रागावतील, या भीतीने चेतन तेथून दुचाकी घेऊन घराकडे आला. 

दुचाकी घराबाहेर लावून सचिन सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरात अाला. त्या वेळी घरात काेणीही नव्हते. भीतीमुळे त्याने घरात पडलेले कीटकनाशक प्राशन केले. काही वेळानंतर चेतनला त्याचा त्रास हाेण्यास सुरुवात झाली. शेजारी राहणाऱ्यांना चेतनची प्रकृती अस्वस्थ असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ चेतनला किनगाव प्राथमिक अाराेग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती जास्तच खालावल्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मृत असल्याचे घाेषित केले.
 
कुटुंबीयांचा अाक्राेश... 
चेतनला सिव्हिलमध्ये दाखल केल्याची माहिती मिळाल्यानंतर आईवडिलांनी तत्काळ सिव्हिल गाठले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी अाक्राेश केला. नातेवाइकांसह ग्रामस्थांनी सिव्हिलमध्ये गर्दी केली हाेती. दुपारी वाजेच्या सुमारास चेतनचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी किनगावकडे घेऊन गेले. 
बातम्या आणखी आहेत...